धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिकसांस्कृतिक
नागोठण्यात श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार

नागोठण्यात श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार
महेश पवार
नागोठणे : नाभिक समाजाचे थोर संत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी समाजाचे आधारस्तंभ भाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणातील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात नागोठणे विभाग नाभिक संघ, महिला आघाडी व संत सेवा मंडळ नागोठणे यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला ह.भ.प विजय महाराज शहासने, ह.भ.प गजानन महाराज बलकावडे यांच्यासह नाभिक संघाचे नागोठणे विभाग अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष मिलिंद गुजर, कार्याध्यक्ष शैलेश रावकर, शहर अध्यक्ष सुधाकर निंबाळकर, खजिनदार रविंद्र टके, सचिव दिगंबर खराडे, उदंड रावकर, हरीशभाई टके, शैलेश रावकर, शामकांत नेरपगार, महेंद्र माने, मंगेश गायकवाड, ॲड. श्रीकांत रावकर, ॲड. रमेश जाधव, मनोज टके, पंकज टके, जयेश टके, महेंद्र पवार, विवेक रावकर, जितेंद्र जाधव, संजय टके, विजय टके, संतोष माने, दिपक पवार, राजेंद्र माने, दिपाली टके, समाजाच्या महिला आघाडी अध्यक्षा कल्पना टके, मनिषा टके, दर्शना खराडे, सारिका सुधाकर निंबाळकर, शालिनी जाधव, मनोरमा रावकर, जयश्री दिवेकर, विजया रावकर, भक्ती जाधव, नीता रावकर, मीना माने, प्रगती जाधव, विजया चव्हाण, स्मिता गुजर, माधवी मोरे, श्रध्दा जाधव, राधा टके, सुनिता गुजर, सारीका जाधव, रोहिणी रावकर आदिंसह समाज बांधव व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये श्रीमती मनोरमा रमाकांत रावकर व श्रीमती शालिनी नरेंद्र जाधव यांच्या सौजन्याने नाभिक समाजातील मान्यवरांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थी व अन्य क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला. दुपारी बाळासाहेब टके यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. सायंकाळी संत सेवा मंडळ नागोठणे यांच्या हरिपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.

पंढरपूर वारीमुळे समाज जिवंत – विवेक रावकर
मी वारीला गेलो म्हणजे विशेष काही केले नाही. वारीचे आपल्या नाभिक समाजावर फार उपकार आहेत. त्या उपकाराची जाणीव ठेऊन आपण सर्वांनी वारीला योगदान दिले पाहिजे. वारीने आपल्याला कीर्तनकार, प्रवचनकार , माळकरी, टाळकरी तसेच धारकरी देखील दिले आहेत आणि त्यांचा योग्य उपयोग करून घेणारे छत्रपती शिवाजी महाराज देखील या वारीने आपल्याला दिलेले आहेत. वारीमुळेच समाज जिवंत असल्याचे प्रतिपादन नागोठणे ग्रामपंचायतचे माजी सदस्य नाभिक समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेक रावकर यांनी केले. आषाढी एकादशी निमित्त प्रथमच नागोठणे ते पंढरपूर पायी वारी करणारे विवेक रावकर यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला त्यावेळी विवेक रावकर यांनी स्वतःला व्यक्त केले.
(सर्व छायाचित्रे : ज्ञानदेव दळवी)




