धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक
नागोठण्यात वैकुंठदादा पाटील मित्र मंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान जय बापदेव वणी मंडळाला
खा. धैर्यशीलदादा पाटील, आ. रविशेठ पाटील, वैंकुठशेठ पाटील व शर्मिलाताई वैकुंठ पाटील यांची दहीहंडी स्थळी भेट

नागोठण्यात वैकुंठदादा पाटील मित्र मंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान जय बापदेव वणी मंडळाला
खा. धैर्यशीलदादा पाटील, आ. रविशेठ पाटील, वैंकुठशेठ पाटील व शर्मिलाताई वैकुंठ पाटील यांची दहीहंडी स्थळी भेट
नागोठणे : भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठदादा पाटील यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात वैकुंठदादा पाटील मित्र मंडळ, पेण यांच्या विद्यमाने नागोठणे नगरीत प्रथमच भारतीय जनता पार्टीचा भव्य दिव्य दहीहंडी उत्सव २०२५ साजरा करण्यात आला. ही मानाची दहीहंडी फोडण्याचा मान जय बापदेव गोविंदा पथक वणी यांना मिळाला.

ही दहीहंडी फोडण्यासाठी जय हनुमान गोविंदा पथक आमडोशी आणि जय बापदेव गोविंदा पथक वणी यांची अंतिम फेरीत निवड झाल्याने या दोन गोविंद पथकांमध्ये बक्षीसाची रक्कम विभागून देण्यात आली. मात्र ही दही हंडी फोडण्यासाठी उडविलेल्या चिठ्ठीतून जय बापदेव वणी या गोविंदा पथकाची चिठ्ठी आल्याने या गोविंदा पथकाला हंडी फोडण्याचा मान मिळाला. यामध्ये प्रथमच मानाची दहीहंडी रोख रक्कम रुपये १ लाख, ११ हजार, १११ आणि आकर्षक चषक, तसेच पुरुष गोविंदांसाठी सहा थरांच्या सलामीला रोख रक्कम रुपये ५ हजार आणि महिला गोविंदांसाठी चार थरांच्या सलामीला रोख रक्कम रुपये ४ हजार अशा प्रकारे बक्षीस देण्यात आले. या दहीहंडी उत्सवास खासदार धैर्यशीलदादा पाटील, आमदार रविशेठ पाटील, भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैंकुठदादा पाटील, रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष शर्मिलाताई वैकुंठ पाटील यांनी भेट दिली. या दहीहंडी उत्सवास ५ महिला गोविंदा पथकासह एकुण २३ गोविंदा पथक सहभागी झाले होते.
या दही हंडी सोहळ्याच्या निमित्ताने नागोठणे पंचक्रोशीतील नागरिकांनी उंचच उंच मानवी मनोऱ्यांचे थरार अनुभवले. यासोबतच मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता त्यामुळे एकाबाजूला दहीहंडीचा थरार आणि सोबत लोकसंगीतातील गाण्यांवर मुद्रा अकॅडमी च्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर करून सर्वांना एका जागेवर खिळून ठेवले, अवघा नागोठणे परिसर मंत्रमुग्ध झाला. प्रथम वर्ष असुनही वैकुंठदादा पाटील मित्र मंडळाने उत्तम नियोजन करून आयोजकांनी संपूर्ण परिसरामधून वाहवा मिळविली. दहीहंडी उत्सवा निमित्त नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.




