पूरमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठण्यातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन वाहनांना केले रेस्क्यू
निसर्ग वन्य जीव संरक्षण संस्था रायगड यांची कौतुकास्पद कामगिरी

नागोठण्यातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन वाहनांना केले रेस्क्यू
निसर्ग वन्य जीव संरक्षण संस्था रायगड यांची कौतुकास्पद कामगिरी
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यात अंबा नदीला सोमवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी दुपार नंतर पुराचे पाणी भरले होते. त्यामुळे नागोठण्यातून महाड व पेण कडे जाण्यासाठी असलेल्या दोन्ही रस्त्यावर लेकव्ह्यू हॉटेल समोर व मरीआई मंदिर समोरील रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लेकव्ह्यू हॉटेल समोरील रस्त्यावर याच पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन वाहनांना सुखरुप बाहेर काढण्याची कौतुकास्पद कामगिरी निसर्ग वन्य जीव संरक्षण संस्था रायगड अर्थात एन.व्ही.एस.एस.आर. टीमने केली आहे.
नागोठण्यातील लेकव्ह्यू हॉटेल समोरील रस्त्यावर अंबा नदीचे पुराचे पाणी भरले होते. तरीही पाण्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात एक इको कार व स्विफ्ट कार पाण्यात अडकल्या होत्या. इको कारमध्ये एक पुरुष, एक गर्भवती महिला व लहान मुले होती तर स्विफ्ट कार मध्ये दोन पुरुष, एक महिला व दोन लहान मुले असलेले मुस्लिम कुटुंब होते. या दोन्ही कुटुंबाला एन.व्ही.एस.एस.आर. टीमकडून
नागोठणे कोळीवाड्यातील तरुणांच्या सहकार्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

या रेस्क्यू मोहिमेत एन.व्ही.एस.एस.आर. संस्थेच्या नागोठणे टीमचे अध्यक्ष अखिल शेलार, उपाध्यक्ष प्रणाल शिर्के, सनिस मिणमिणे, मनोज माळी, अथर्व ताडकर, करण बावकर, कल्पेश बडे, अथर्व बडे, साहिल राणे, सुजल अडसुळे, दिनेश घासे, वैभव तालगिरे, जयेश बावकर तसेच नागोठणे कोळी वाड्यातील तरुण सहभागी झाले होते.




