तांत्रिकमहाराष्ट्र ग्रामीण
नंदप वाडी येथील ट्रांसफार्मर तातडीने बदलला

नंदप वाडी येथील ट्रांसफार्मर तातडीने बदलला
निडी (वर्षा सहस्त्रबुद्धे) : कार्यतत्पर आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या तत्परतेने व रोहा तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांच्या पाठपुराव्याने ग्रुप ग्रामपंचायत सरसोली येथील मौजे नंदप वाडी येथील ट्रांसफार्मर (डीपी) अत्यंत तातडीने बदलण्यात आली. सदर वेळी अशोक सानप, योगिता शिर्के, महिला आघाडी रोहा तालुका संपर्कप्रमुख यांनी पाठपुरावा करून सदर काम योग्यरीत्या करून घेतले.