Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण
पाटणसई तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी मोतीराम गायकर यांची बिनविरोध निवड

पाटणसई तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी मोतीराम गायकर यांची बिनविरोध निवड
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील पाटणसई (ता. रोहा) ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी पाटणसई गावातील सामाजिक कार्यकर्ते मोतीराम गोपाळ गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पाटणसई ग्रामपंचायतीची १३ ऑगस्टची कोरम अभावी तहकूब झालेली ग्रामसभा पाटणसई ग्रामपंचायतीच्या कै.देविदास गणपत गायकर सभागृहात १९ ऑगस्ट रोजी घेण्यात आली त्यावेळी सर्वानुमते मोतीराम गायकर यांची निवड करण्यात आली.
रोहा पंचायत समिती मधील अधिकारी तथा पाटणसई ग्रामपंचायतीचे प्रशासक तेजस दिवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या ग्रामसभेला रोहा पंचायत समितीचे माजी सभापती असलेले पाटणसईचे ग्रामस्थ आणि नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीचे विद्यमान सभापती सदानंद गायकर, पाटणसई ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका शर्मिला ठाकूर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दीपक महाडिक, पाटणसईच्या पोलीस पाटील वैशाली गायकर, शिवराम गायकर, युवा सेना रोहा तालुका सचिव मंदार कोतवाल आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी मोतीराम गायकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




