महाराष्ट्र ग्रामीणमहिला विशेषसांस्कृतिक
राज्यस्तरीय पाककला स्पर्धेत अंतिम १० स्पर्धकांत सेजल खराडेची निवड
ब्रेकफास्टचा पदार्थ बनविण्याची झाली स्पर्धा

राज्यस्तरीय पाककला स्पर्धेत अंतिम १० स्पर्धकांत सेजल खराडेची निवड : २१ ऑगस्टला होणार दुसरी फेरी
ब्रेकफास्टचा पदार्थ बनविण्याची झाली स्पर्धा
महेश पवार
नागोठणे : भारत विकास परिषद, पनवेल शाखा यांच्या सहकार्याने आणि स्व.सौ.मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठान पनवेल यांच्या विशेष सहकार्याने
आणि मिती ग्रुप आयोजित, पितांबरी रुचियाना प्रस्तुत पनवेल श्रावण महोत्सव २०२५ या भव्य पाककला स्पर्धेची पहिली फेरी शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी न्यू पनवेल येथील श्री बँक्वेट, शबरी हॉटेल लेन येथे संपन्न झाली. याच स्पर्धेत नागोठण्याची सौ. सेजल दीपक खराडे – चाफेकर यांची अंतिम १० स्पर्धकांत निवड झाली आहे. या स्पर्धेचे हे ११ वे वर्ष होते.

या स्पर्धेत ब्रेकफास्टचा पदार्थ तयार करणे हा विषय ठेवण्यात आला होता.सेजल खराडे यांनी आपल्या पाककला कृतीचा पुरेपूर अनुभव पणाला लावून “बायोटिन लाडू” हा पदार्थ तयार केला. सेजल यांनी तयार केलेला हा पदार्थ परीक्षकांच्या पसंतीस उतरल्याने त्यांची अंतिम १० स्पर्धकांत निवड करण्यात आली आहे.
यापूर्वीही सेजल खराडे यांनी अनेक पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या पाककला स्पर्धेची दुसरी फेरी शिवाजी पार्क, मुंबई येथे २१ ऑगस्टला होणार आहे. या यशासाठी सर्वत्र सेजल खराडे यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.