खेळमहाराष्ट्र ग्रामीण
राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत रायगडच्या मुलांची नेत्रदीपक कामगिरी
बारा पदकांची केली लयलूट

राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत रायगडच्या मुलांची नेत्रदीपक कामगिरी
बारा पदकांची केली लयलूट
महेश पवार
नागोठणे : कोपरखैरणे येथील क्रिस्ट अकॅडमी येथे दिनांक १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या १५ व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत
रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी १२ पदके जिंकत या स्पर्धेत रायगड जिल्ह्याची छाप पाडली आहे. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ३५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
पिंच्याक सिलाट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट चा खेळ असून यामध्ये टँडिंग (फाईट) , तुंगल (सिंगल इव्हेंट), रेगु (ग्रुप इव्हेंट), गंडा (डेमो फाईट), सोलो (क्रीएटीव्हिटी) या पाच प्रकारामध्ये खेळला जातो. या स्पर्धेत खेळताना रायगडच्या खेळाडूंनी ५ सुवर्णंपदके आपल्या नावावर केली.
या स्पर्धेत टँडिंग (फाईट) मध्ये सुबोर्ण चक्रवर्ती, अर्णव रावकर, स्पृहा विचारे, पियुष साळुंके, नेहा दोरे या खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकल्याने कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. टँडिंग (फाईट) रौप्यपदक विजेते खेळाडू संकल्प चक्रवर्ती, रियांशी सिंह, शर्वरी खोपकर, प्रांजल खरपूडे, प्रीत माळी, अनिश पालकर याने सोलो इव्हेंट मध्ये व टँडिंग मध्ये रौप्यपदक जिंकून रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
रायगडच्या संघासोबत कु. सम्यक गायकवाड याने टीम कोच म्हणून आपली निवड सार्थ ठरवली. सर्व खेळाडू हे रायगड जिल्हा पिंच्याक सिलाट संघटनेचे सचिव धनंजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून सर्व खेळाडूंचे रायगड पिंच्याक सिलाट संघटनेचे अध्यक्ष रुपेश जाधव यांनी अभिनंदन केले.




