रोहा अष्टमी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये भव्य प्रवेश
नवीन प्रवेश कर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती

रोहा अष्टमी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेमध्ये भव्य प्रवेश
नवीन प्रवेश कर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती
वर्षा सहस्त्रबुद्धे
निडी – नागोठणे : दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर यांच्या उपस्थितीमध्ये अष्टमी येथील नारायण खुळे, अमलाकांत मोरे, शिरीष ऐनकर, गौरव बडे, कुणाल पिटनाईक, नितेश ऐनकर व इतर ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेश कर्त्यांचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले आणि सर्वांना शिवसेनेत मानसन्मान मिळेल याची ग्वाही दिली.
आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या राजमाळा येथील कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होताच, ग्राहक संरक्षण संघटनेचा अनुभव असलेले नारायण खुळे यांची शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दक्षिण रायगड उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली तसेच नितेश ऐनकर यांची युवा सेना उपशहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्रही दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते नारायण खुळे व नितेश ऐनकर यांना देण्यात आले.