कायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण
वांगणी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी शंकर ठाकूर यांची बिनविरोध निवड

वांगणी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी शंकर ठाकूर यांची बिनविरोध निवड
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील वांगणी येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते
शंकर ठाकुर यांची वांगणी ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल वांगणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वांगणीचे माजी सरपंच लहूशेठ तेलंगे, एकनाथ दळवी, लिलाधर भिसे, वसंत भिसे, तुकाराम (बाळा)भिसे, नरेश दळवी यशवंत यादव, विश्वनाथ शिर्के, राकेश भिसे, जगन दळवी, मोहन मांडे, सचिन तेलंगे, दिपक यादव, चंद्रकांत शिर्के, यशवंत (बाळा) भिसे, चंद्रकांत हि. दळवी, नारायण भिसे आदी ग्रामस्थ होते उपस्थित होते. शासनाच्या निर्णाया नुसार प्रत्येक ग्रामंचायतीला १५ ऑगस्टला नविन तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड करायची असते. त्यानुसार वांगणी ग्रामपंचायतीचा तंटामुक्त समिती अध्यक्षांचा या वर्षीचा बहुमान पुन्हा एकदा शंकर ठाकूर यांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




