महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा
महेश पवार
नागोठणे : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी महिला सबलीकरण, नारी शक्ती व उर्जा बचत आदी विषयांवरील सुमारे पंचवीस पोस्टर्स चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन अंतर्गत मुल्यमापन समिती प्रमुख डॉ.संदेश गुरव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. दिनेश भगत, कार्यक्रम अधिकारी व शिक्षक उपस्थित होते. दुसऱ्या सत्रामध्ये प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांनी युवकांनी ‘विकसित भारत -२०४७’ चे ध्येय ठेवून विद्यार्थ्यांनी कार्य करावे. विकसित भारताचे स्वप्न पुर्णत्वास नेण्यासाठी युवकांची भुमिका महत्वाची असल्याने युवकांनी प्रथम स्वत:चा विचार न करता देशाचा विचार करण्याचे अवहान विद्यार्थ्यांना केले. प्रा. डॉ. संदेश गुरव यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग रोहा तालुका समन्वयक महेश गोसावी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एच आय व्ही एड्स या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा इतिहास, ध्येय व उद्दिष्ट स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सलोनी सिंग हिने केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर शिरसाठ यांनी मानले. सदर कार्यक्रमास वनस्पती विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय चव्हाण, प्रा. डॉ. विलास जाधवर, प्रा, डॉ. विकास शिंदे, डॉ. राणी ठाकरे, प्रा. चैत्राली पाटील, कु. सुमित, कु. कुणाल, कु. पुजा कु. सानिका सह अनेक राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवक उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





