तांत्रिकमहाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात संगणक साक्षरता कार्यशाळा संपन्न

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात संगणक साक्षरता कार्यशाळा संपन्न
महेश पवार
नागोठणे : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाविद्यालयात ‘संगणक साक्षरता’ या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश व. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी प्रा. सौ. निलम महाले या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

प्रा. सौ. निलम महाले यांनी या कार्यशाळेत संगणक प्रणाली बद्दल तसेच सायबर क्राईम, रिल्स बनविण्यासाठी लागणारी कल्पकता, व्हिडिओ एडिटिंग करून ती अपलोड करणे तसेच सोशल मीडियावर व माय भारत पोर्टलवर माहिती अपलोड करणे आदी बाबतीत विद्यार्थ्यांना सविस्तर सांगितले. या प्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मनोहर शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास प्रा. कु. पल्लवी चव्हाण, प्रा. प्रियंका पत्की, कु. सुमित घासे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





