ऐनघर येथे रंगणार शक्ती – तु-याचा जंगी सामना

ऐनघर येथे रंगणार शक्ती – तु-याचा जंगी सामना
दिनेश ठमके
सुकेळी : नागोठणे जवळच असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ऐनघर यांच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधुन शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शक्ती – तु-याचा जंगी सामना होणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
या जंगी मुकाबल्यामध्ये लेडीज व जेन्ट्स असा नाचाचा मुकाबला होणार आहे. शक्तीवाले म्हणून जय हनुमान नाच मंडळ बेलोशी- वडवाडी, अलिबाग तर तुरेवाले सिद्धिविनायक नाच मंडळ चिंचवली, अलिबाग यांच्यात रंगत होईल. शक्तीवाल्यांकडुन गायिका म्हणून सौ.सारिका वाघमारे, गुरुवर्य जयदास पांरगे, कविवर्य निळेश शेट्टी, ढोलकी वादक आदित्य नाईक, तुळसिदास काटकर, टोमंली वादक विलास बाईत, सुनिल नाईक, कोरस चंद्रा नाईक, पुनम नाईक, बॅजों अजित नाईक तर तुरेवाल्यांकडुन गायक विनोद भोईर, ढोलकी वादक रोहीत नाईक, बॅजों वादक विजय नाईक, झांजवाले काशिनाथ वाघमारे , संच प्रमुख राजेंद्र पवार, विजय हिलम यांचा सहभाग असणार आहे. तरी या जंगी मुकाबल्याचा सामना पाहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ऐनघर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.




