बाळसई येथिल सात दिवसांच्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप

बाळसई येथिल सात दिवसांच्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप
दिनेश ठमके
सुकेळी : गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या….च्या नामघोषात नागोठणे विभागासह बाळसई , वाकण, पाटणसई, वांगणी, आमडोशी, सुकेळी परिसरातील गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची सात दिवसांची मनोभावे सेवा केल्यानंतर जड अंतःकरणाने गणपती बाप्पांना तसेच गौरींना निरोप दिला. अंत्यंत शांततापुर्ण वातावरणात पार पडलेल्या गणेश विसर्जनाला पावसाने मात्र दमदार हजेरी लावली होती.
बाळसई गावातील जवळ- जवळ ९० ते १०० बाप्पांची सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन मिरवणूकीसाठी काढण्यात आली. यावेळी ढोल- ताशांच्या गजरात सर्वच भक्तगण नाचण्यामध्ये दंग झाले होते . गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या..! एक- दोन – तीन- चार.. गणपतीचा जयजयकार अशा नामघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंबा नदी घाटावर सामुदायिक आरती झाल्यानंतर सर्वच गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली हा गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला.




