महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिकसांस्कृतिक

डॉक्टर नेल्सन मंडेला आश्रम शाळेत भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा 

मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत घेतला स्नेहभोजनाचा आनंद 

डॉक्टर नेल्सन मंडेला आश्रम शाळेत भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा 

मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत घेतला स्नेहभोजनाचा आनंद 
महेश पवार 
नागोठणे : नागसेन एज्युकेशन सोसायटी अँड बुद्धसेन कल्चरल ट्रस्ट मुंबई ‌द्वारा संचलित, नागोठणे येथील डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेच्या वतीने ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ३५ वर्षांची शैक्षणिक वाटचाल असलेल्या या निवासी आश्रम शाळेत दिवसभर विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांच्या गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. सुट्टी असूनही प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या रायगड जिल्ह्याच्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी मोनिका काळे, मुख्याध्यापक नवनाथ डोंगरगावकर, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे आदींसह शाळेचे माजी विद्यार्थी, शासकीय कर्मचारी व आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी नागोठणे भागात कार्यरत असलेल्या या शाळेचा ३५ वर्षांचा आराखडा सादर करून शाळेसाठी ३ एकर जागेची आवश्यकता असूनही शासन दखल घेत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. मागास बहुजन कल्याण अधिकारी मोनिका काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आश्रम शाळेतून शिक्षण घेऊनही अनेक विद्यार्थी शासनाच्या  मोठ्या पदावर पोचले आहेत तर काही विद्यार्थी परदेशात मोठमोठ्या खासगी कंपनीत उच्च पदावर नोकरी करीत असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांनीही त्यासाठी प्रयत्न करावेत. मुख्याध्यापक नवनाथ डोंगरगावकर यांनी या शाळेचे विद्यार्थी शासनाच्या अनेक मोठ मोठ्या पदावर काम करीत असल्याचे स्पष्ट केले. शेवटी सर्वांनी आश्रम शाळेतील आजी व माजी विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन घेतल्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!