जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाणुन घेतल्या मांडवशेत आदिवासी वाडीच्या समस्या
धरती आबा विकास योजनेअंतर्गत समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाणुन घेतल्या मांडवशेत आदिवासी वाडीच्या समस्या
धरती आबा विकास योजनेअंतर्गत समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन
दिनेश ठमके
सुकेळी : जनजातीय गौरव वर्षे २०२५ घ्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आदिवासी समाजाच्या विकासासाठी दोन महत्वपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रधानमंत्री जनजमाती न्याय महाअभियान आणी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अशा दोन योजनांचा यामध्ये समावेश आहे. याच उपक्रमांतर्गत आदिवासी समाजाच्या नागरीकांना सक्षम बनविण्यासाठी विविंध योजना हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नुकतीच रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधिल मांडवशेत आदिवासी वाडीवर प्रत्यक्षात जाऊन तेथिल नागरीकांच्या समस्या जाणुन घेतल्या.
यावेळी येथिल नागरीकांनी आपल्याला भेडसावत असणा-या अनेक समस्या जिल्हाधिका-यासमोर मांडल्या. या समस्यांमध्ये मांडवशेत आदिवासी वाडीकडे येणारा मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ता, पाण्याची समस्या, घरकुल समस्या, दाखले तसे रेशनकार्डचया बाबतीत अशा अनेक समस्या यावेळी उपस्थित करण्यात आल्या. या सर्व समस्या भारती आबा विकास योजनेअंतर्गत लवकरात लवकर सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मांडवशेत ग्रामस्थांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह तहसिलदार किशोर देशमुख, सह.गटविकास अधिकारी महादेव शिंदे, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे , विस्तार अधिकारी सुनिल गायकवाड, शाखा अभियंता अमित चिपळूणकर, सहाय्यक प्रकल्प ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.कलावती कोकळे, उपसरपंच भगवान शिद, जेष्ठ सदस्य मनोहरभाई सुटे, आधार फाउंडेशनचे संस्थापक नामदेव वाघमारे, ऐनघर ग्रामपंचायत माजी सदस्य सचिन भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोकळे, सुरेश वाघमारे, दत्ता पवार, संतोष वाघमारे, योगेश वाघमारे, अशोक पवार, बेबी वाघमारे,गीता पवार आदि मांडवशेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




