खेळधार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक
मास्टर मेघ पोटे याचे नागोठण्यात गुरुवारी बासरी वादन
श्री जोगेश्वरी माता मंदिरात रंगणार सुरांची मैफिल

मास्टर मेघ पोटे याचे नागोठण्यात गुरुवारी बासरी वादन
श्री जोगेश्वरी माता मंदिरात रंगणार सुरांची मैफिल
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील मराठा आळी भागातील रहिवासी आणि मुंबई येथील “कान्हा फ्लूट्स” बासरीचे उत्पादक निलेश पोटे यांचे चिरंजीव मास्टर, कुमार मेघ पोटे यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय बासरी वादन कार्यक्रमाचे आयोजन नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिरात दसऱ्याच्या दिवशी गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले आहे.

पंडित रूपक कुलकर्णी यांचा शिष्य असलेल्या कुमार मेघ पोटे याच्या बासरी वादनाचा कार्यक्रम नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिरात गेल्या काही वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी सकाळी श्री जोगेश्वरी माता उत्सव समिती कडून आयोजित करण्यात येत असतो. त्याप्रमाणेच यावर्षीही मास्टर, कुमार मेघ पोटे याच्या बासरी वादन कार्यक्रमाचे आयोजन बासरी चे उत्पादनकर्ता असलेल्या “कान्हा
फ्लूट्स” यांच्याकडून करण्यात आले आहे.

मास्टर मेघ पोटे याच्या या बासरी वादन कार्यक्रमात निवेदक प्रवीण धाडसे, तबला वादक सुहान बाईत व टाळ वादक कुमार रणवीर भंडारी यांची साथ कुमार मेघ पोटे याला मिळणार आहे. या बासरी वादन कार्यक्रमाला संगीत रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन “कान्हा फ्लूट्स” यांच्याकडून करण्यात आले आहे.




