गुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी ॲक्शन मोडवर
वरवठणे येथे गावठी दारू जप्त : अवैध गुटखा प्रकरणी टपरी व किराणा माल दुकानांची तपासणी संबंधित पोलिसांनाही तंबी

नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी ॲक्शन मोडवर
वरवठणे येथे गावठी दारू जप्त : अवैध गुटखा प्रकरणी टपरी व किराणा माल दुकानांची तपासणी
संबंधित पोलिसांनाही तंबी
महेश पवार
नागोठणे : नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारचे अवैध धंदे तसेच अवैध गुटखा व सुगंधी पान मसाला विक्री प्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सपोनि सचिन कुलकर्णी ॲक्शन मोडवर आले आहेत. सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे शहर व परिसरातील अवैध मटका व्यवसाय, अवैध गावठी दारू, गुटखा, इतर अवैध धंदे प्रकरणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच नागोठणे पोलिस ठाण्यातील बेशिस्तपणाच्या इतर प्रकरणातील
संबंधित पोलिसांनाही सक्त तंबी देण्यात आल्याची माहितीही प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे.

नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांनी विविध प्रकारच्या अवैध धंद्याची शोधमोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून नागोठणे जवळील वरवठणे येथे अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्या एक महिले विरोधात कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सुमारे एक हजार रुपये किंमतीची १० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिस हवालदार अथर्व पाटील, पोलीस शिपाई सौरभ पाटील, महिला पो. ह. साक्षी पाटील, दोन होमगार्ड सहभागी झाले होते. याप्रकरणी पो. ह. राकेश राऊळ पुढील तपास करीत आहेत.

याशिवाय नागोठणे पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक जि. डी. पावरा, उपनिरीक्षक सुरज पाटील, पो. ह. महेश लांगी, पोलिस शिपाई स्वप्नील भालेराव, पो. शि. बळी पुट्टेवाड यांच्या टीम कडून अवैध गुटखा, सुगंधी पान मसाला प्रकरणी नागोठण्यातील व परिसरातील सर्व टपरी धारक, किराणा माल दुकानदार यांची झाडा झडती घेण्यात आली आहे.
सर्व टपरी व किराणा दुकाने यांची कसून तपासणी करण्यात आली असून यापुढेही ही तपासणी सुरू राहणार आहे. नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठेही, कोणताही मटका, जुगार वा इतर अवैध धंदा, गुटखा, गावठी दारू मिळून आल्यास किंवा यासंबधी माहिती मिळाल्यास संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचा इशारा सपोनि सचिन कुलकर्णी यांनी दिला आहे. नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.




