आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे प्रा. आ. केंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान शिबीर संपन्न
निक्षय मित्र डॉ. आदीत्य शिरसाठ यांचा सत्कार

नागोठणे प्रा. आ. केंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान शिबीर संपन्न
निक्षय मित्र डॉ. आदीत्य शिरसाठ यांचा सत्कार
महेश पवार
नागोठणे : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत रायगड जिल्हा परीषद अलिबाग, आरोग्य विभाग मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे गुरुवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान शिबीर उत्साहात संपन्न झाले.

या शिबीरासाठी नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई संजय महाडीक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या शिबीरास रोहा तालूका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका सांळूखे, वैदयकीय अधिकारी डॉ. आदीत्य शिरसाठ यांनी शिबिरात उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या शिबीरात डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथील डॉ. ईशा भंडारी, डॉ मेघराज दावे, डॉ दर्शनी गांधी, डॉ हर्षनी मोगपाठी यांनी रूग्ण तपासणी केली. याप्रसंगी डॉ. विकास यादव, डॉ. नितीन टकले, अलिबाग येथील तंबाखु नियंत्रण कार्यक्रम अधिकारी डॉ. सुशिल साईकर, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी अनिल हावरे, समाज सेवक अधिक्षक श्रीमती हर्षा जाधव, आरोग्य सहायक, शांताराम घरत, राजेंद्र पवार, भारत मारकड, आरोग्य सहायिका श्रीमती फुलवंती पवार, नेत्रचिकीत्सक अरविंद माटल, औषध निर्माण अधिकारी श्रीमती अपर्णा साजेकर, कनिष्ठ सहाय्यक, अनिकेत देवरे, वंदन तांबोळी, जगदीश मोकल, योगेश अभिनव, महेश येरोळकर, आषिश दसरे, प्रफुल उंदीरखडे, प्रशांत वऱ्हाडे, आरोग्य सेवक रजत बोरीकर, श्रीमती शोभा पवार, श्रीमती जयश्री सिंग, श्रीमती तृप्ती देशमुख, श्रीमती पल्लवी पाटील, श्रीमती कांचन तेलंगे, श्रीमती प्रतिभा ताडकर, श्रीमती बुरूमकर, पोटफोडे, शेडगे गट प्रवर्तक नागोठणे व सर्व आशा सेविका उपस्थित होत्या.

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदीत्य शिरसाठ “निक्षय मित्र” झालेले आहेत व त्यांच्या हस्ते क्षयरोग रुग्णांकरिता फूड बास्केट वितरीत करण्यात आले. त्याबद्दल डॉ. आदीत्य शिरसाठ यांना रोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका सांळुखे यांचे हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.




