नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ
मंदिरात नऊ दिवस रंगणार धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ
मंदिरात नऊ दिवस रंगणार धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या देवतांची सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास घटस्थापना करून श्री जोगेश्वरी मातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री जोगेश्वरी माता विश्वस्त समिती तसेच नवरात्रौत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व देवीचे भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवरात्रोत्सवा निमित्त नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज यांचे मुखवटे व दागिने सुरक्षित ठिकाणा वरून सोमवारी दुपारी गोंधळ्याच्या साथीने वाजत गाजत मंदिरात नेण्यात आले.
यावेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव भाई टके, विलास चौलकर, विठ्ठल तात्या खंडागळे, हरेश टके, पांडुरंग कामथे, उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर, सचिव विवेक देशपांडे, खजिनदार जितेंद्र कजबजे, सह खजिनदार सतीश पाटील, कार्यकारिणी सदस्य विशाल खंडागळे, अनंत चितळकर, दिगंबर खराडे, प्रशांत पानकर, राजेंद्र गुरव, सखाराम ताडकर, मनोज टके, चेतन टके, हितेश भोय, सुदर्शन कोटकर, सुभाष ताडकर, पंकज टके, केतन भोय, दीपाली दिलीप टके, राजश्री हरेश टके, प्रियांका मनोज टके, पायल चेतन टके, कु. नैमिष मनोज टके, कु. ईशान चेतन टके आदींसह उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

गुरुवार दि. २ आॅक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात दररोज सायंकाळी महाआरती, हरिपाठ, रास गरबा, याबरोबरच भजन, श्री दुर्गामाता सप्तशती पाठ, भोंडला नृत्य, संगीतमय कार्यक्रम, हळदी कुंकू, बासरी वादन तसेच रोज रात्री साडेनऊ वाजता नवी मुंबई येथील कीर्तनकार ह.भ.प. राजेंद्र मांडेवाल यांचे कीर्तना बरोबरच विविध भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नऊ दिवस करण्यात आले आहे.
नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान शहर व परिसरांतील हजारो भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतात. त्यामुळे हा नवरात्रोत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी श्री जोगेश्वरी माता देवस्थानचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव भाई टके व विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर, सचिव विवेक देशपांडे, सहसचिव अनिल पवार, खजिनदार जितेंद्र कजबजे, सह खजिनदार सतीश पाटील आदींसह विश्वस्त समिती व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.




