धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक
नामदार आदितीताई तटकरे यांनी घेतले श्री पळसाई मातेचे दर्शन
देवीची ओटी भरून केली मनोभावे प्रार्थना

नामदार आदितीताई तटकरे यांनी घेतले श्री पळसाई मातेचे दर्शन
देवीची ओटी भरून केली मनोभावे प्रार्थना
महेश पवार
नागोठणे : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवानिमित नागोठण्याजवळील पळस येथील जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या श्री पळसाई मातेचे सोमवारी(दि.२९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दर्शन घेतले. त्यानंतर श्री पळसाई माता देवस्थान व पळस ग्रामस्थांच्या वतीने ना. आदितीताई तटकरे यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री पळसाई माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे, उपाध्यक्ष मारुती शिर्के, पळस ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया डाकी, उपसरपंच चंद्रकांत भालेकर, माजी सरपंच हिराजी शिंदे, माजी सरपंच निष्ठा विचारे, ग्रामपंचायत सदस्य किसन बोरकर, राकेश शिंदे, राजेंद्र शिंदे, अमिता शिंदे, नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, प्रकाश कदम, नितीन राजीवले, मधुकर मढवी, वामन मढवी, मंदार चितळे, सौ. ज्योती चंद्रकांत भालेकर आदींसह पळस ग्रामपंचायतीचे सदस्य, उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून श्री पळसाई माता मंदिर व मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण झाले आहे. खासदार सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून नागोठणे विभागातील विकास कामांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला असून यापुढेही खासदार तटकरे साहेब आणि तटकरे कुटुंबियांकडून नागोठणे विभागासाठी निधीची कमतरता भासणार नाही असे आश्वासन यावेळी नामदार आदितीताई तटकरे यांनी दिले.




