नवरात्रौत्सवानिमित्त अनिकेतभाई तटकरे यांनी घेतले ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन
नागोठण्यातील इतरही नवरात्रौत्सव मंडळांना दिली भेट

नवरात्रौत्सवानिमित्त अनिकेतभाई तटकरे यांनी घेतले ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन
नागोठण्यातील इतरही नवरात्रौत्सव मंडळांना दिली भेट
महेश पवार
नागोठणे : नागोठणे व परिसरात सर्वत्रच नवरात्रौत्सवाची धामधूम पहावयास मिळत आहे. अशातच विधानपरिषदेचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व अनिकेतभाई तटकरे यांनी शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास नवरात्रौत्सवानिमित्त नागोठण्यात भेट देऊन ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता, व्याघ्रेश्वर व भैरवनाथ या देवतांचे दर्शन घेतले.

यावेळी उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत ताडकर व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे स्वागत व सत्कार केला. यानंतर माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी येथील के.एम.जी. विभागातील राधाकृष्ण मंदिर, कानिफनाथ मंदिर तसेच बाजारपेठ येथील नवरात्र उत्सव स्थळी भेट देऊन दर्शन घेतले. या सर्व ठिकाणी नवरात्रोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही अनिकेतभाई तटकरे यांचे स्वागत केले.

यावेळी श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव भाई टके, हरेश काळे, विलास चौलकर, बाळासाहेब टके, बिपिन सोष्टे, भाऊ आमडोसकर, आनंद लाड, मयूर खैरे, उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, मनोज टके, अतुल काळे, चेतन टके, प्रथमेश काळे, गुड्डू मोदी, श्रीपाल जैन, ग्रामपंचायत सदस्या पूनम काळे, राजेश पिंपळे, सिद्धेश काळे, केतन भोय, विलास खंडागळे, संतोष कावेडिया, कमलेश जैन, चेतन ठक्कर आदींसह उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





