कायदेविषयकगुन्हेगारी वृत्तमहिला विशेष
सपोनि सचिन कुलकर्णी यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षकांकडून सन्मान
उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागोठणे पोलिस कर्मचाऱ्यांचाही गौरव

सपोनि सचिन कुलकर्णी यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षकांकडून सन्मान
उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागोठणे पोलिस कर्मचाऱ्यांचाही गौरव
महेश पवार
नागोठणे : उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलिस कर्मचारी यांचा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून नागोठण्याचे प्रभारी अधिकारी, सपोनि सचिन कुलकर्णी व अन्य कर्मचाऱ्यांना रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल व अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांच्याकडून प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
नागोठणे पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज तसेच क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क्स अँड सिस्टिम्स (सीसीटीएनएस) यामध्ये जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याने नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी व त्यांचे पोलीस पथकातील पोलीस हवालदार महेश लांगी,पोलीस हवालदार सुनील वाघ, पोलीस शिपाई स्वप्निल भालेराव यांनाही गौरविण्यात आले.
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबा नदीच्या पाण्याच्या पात्रात दिनांक २१ ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान एका महिलेने उडी मारल्याचे समजताच सदर ठिकाणी जाऊन सदर नदी पात्रात पोलीस हवालदार सुनील वाघ व पोलीस शिपाई स्वप्निल भालेराव असे नदीच्या पात्रात उडी मारून तसेच सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी पोलीस हवालदार महेश लांगी यांनी रस्सीच्या सहाय्याने मदत करून सदर पाण्यात उडी मारलेल्या महिलेला पाण्यातून बाहेर काढून तिचे प्राण वाचविण्याचे कार्य केले.

त्याचप्रमाणे सीसीटीएनएस मध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने प्रभारी अधिकारी सपोनि सचिन कुलकर्णी व महिला पो.ह. मांटे यांना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल रायगड जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व कर्तबगार अधिकाऱ्यांना व पोलिसांना रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. या सत्कार बद्दल नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





