निधनमहाराष्ट्र ग्रामीण

वांगणी येथील रामचंद्र तेलंगे यांचे निधन 

वांगणी येथील रामचंद्र तेलंगे यांचे निधन 

महेश पवार 
नागोठणे : नागोठण्याजवळील वांगणी (ता. रोहा) येथील रहिवासी रामचंद्र तुकाराम तेलंगे (वय ९२) यांचे बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी वयोवृद्धत्वामुळे निधन झाले. वांगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लहू तेलंगे यांचे ते वडील होत.  दिवंगत रामचंद्र तेलंगे यांच्या पार्थिवावर वांगणी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी तेलंगे यांचे आप्तेष्ट, मित्र परिवार,  सगेसोयरे यांच्यासह परिसरातील नागरिक तसेच वांगणीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वांगणी गावातील सामाजिक धार्मिक कार्यात हिरीरीने सहभागी होणारे रामचंद्र तेलंगे यांना
कबड्डी या खेळाची तसेच गोविंदाची खूप आवड होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी तारामती, दोन विवाहित मुलगे लहू व दिगंबर, तीन विवाहित मुली जयश्री रटाटे,  शुभांगी कदम, अंजना देवकर, सुना, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. दिवंगत रामचंद्र तेलंगे यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी वांगणी येथील तलावाजवळ तर उत्तरकार्य सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी वांगणी येथील त्यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे लहू तेलंगे यांनी तेलंगे कुटुंबियांच्या वतीने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!