आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे लायन्स क्लबचे काम कौतुकास्पद
नागोठणे लायन्स क्लबच्या शिबिरात ४३ रुग्णांची डोळे तपासणी : मोतीबिंदू १७ रुग्णांची होणार शस्त्रक्रिया

दृष्टीहीनांना दृष्टी देण्याचे नागोठणे लायन्स क्लबचे काम कौतुकास्पद : एम जे एफ लायन अनिल म्हात्रे यांचे गौरोद्गार
नागोठणे लायन्स क्लबच्या शिबिरात ४३ रुग्णांची डोळे तपासणी : मोतीबिंदू १७ रुग्णांची होणार शस्त्रक्रिया
महेश पवार
नागोठणे : नागोठणे लायन्स क्लबची स्थापना जेव्हा १९८४ ला झाली त्याचवेळी मी अलिबाग लायन्स क्लब चा सदस्य झालो. नागोठणे लायन्स क्लबने स्थापनेपासून सर्वोत्तम सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यापैकीच एक असलेल्या नेत्रचिकित्सा शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मधून त्यांनी हजारो दृष्टीहीनांना दृष्टी देण्याचे कौतुकास्पद काम केले असल्याचे गौरोद्गार लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर (व्हिजन) एम जे एफ लायन अनिल म्हात्रे यांनी नागोठण्यात बुधवारी(दि.१) संपन्न झालेल्या मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिरात काढले तसेच नागोठणे लायन्स क्लबचे विविध बाबतीत तोंड भरून कौतुकही केले. याचवेळी अलिबाग लायन्स हेल्थ फाउंडेशनचे चोंढी येथील हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार असल्याचे सांगून तेथे नेत्र रुग्णांसाठी सुसज्ज विभाग सुरू होणार असल्याचेही अनिल म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष सखाराम ताडकर यांनी आपले वडील कै. पदाजी ताडकर व आई कै. द्रौपदी ताडकर यांचे स्मरणार्थ आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटल नवीन पनवेल यांच्या सहकार्याने नागोठणे लायन्स क्लबने येथील शांतीनगर भागातील स्व. बाळासाहेब ठाकरे बाल उद्यानात आयोजित केलेल्या या शिबिरास प्रमुख पाहुणे एम जे एफ लायन अनिल म्हात्रे यांच्यासह नागोठणे लायन्स क्लब अध्यक्ष लायन सखाराम ताडकर, चार्टड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, एम जे एफ लायन सुधाकर जवके, शिक्षण विभागाचे डिस्ट्रिक्ट चेअरमन, एम.जे.एफ लायन यशवंत चित्रे,
झोनल चेअरमन एमजेएफ लायन विवेक सुभेकर, सेक्रेटरी लायन डॉ.अनिल गिते, लायन व नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, लायन दौलत मोदी, लायन जयराम पवार, लायन विनोद सावंत, लायन सुजाता जवके, लायन पांडुरंग शिंदे, लायन सुनील कुथे, लायन विवेक करडे, लायन विजय शहासने, लायन दीपक लोणारी, लायन सिद्धेश काळे, लायन विद्या म्हात्रे,
नागोठणे ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर, राजू टेमकर, सखाराम ताडकर यांची पत्नी सौ. संजीवनी ताडकर, नातू जिमित सौरभ ताडकर, भाऊ पांडुरंग ताडकर, बहीण काशी बठारे, मोहन म्हात्रे, ॲड. स्मिता कुथे, आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटलचे सुजय कोल्हापुरे, समृद्धी जंगम, अमिता गबरे आदींसह अनेक मान्यवर व परिसरातील नागरिक नेत्र तपासणीसाठी यावेळी उपस्थित होते.

या शिबिरात ४३ नागरिकांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली. यामध्ये मोतिबिंदू आढळलेल्या १७ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठविण्यात येणार आहे. यावेळी लायन डॉ.अनिल गीते यांनी मोतीबिंदू शास्त्रक्रिये नंतरची डोळ्यांची निगा व काळजी याविषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती उपस्थित नागरिकांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी केले.

यावेळी सखाराम ताडकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझ्या आई वडिलांनी मला काही कमी पडू दिले नाही व भविष्यातही पडणार नाही म्हणूनच कुणालाही अंधत्व राहू नये यासाठी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ आपण हे नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित केल्याचे सांगताना त्यांचे मन भरून आले. यावेळी प्रकाश जैन व सुधाकर जवके यांनीही आपले मनोगत व्यक्त करून डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर अनिल म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक केले.





