मढाळी – रोहा येथील रमेश भ़ोसले यांचें अल्पशा आजाराने निधन

मढाळी – रोहा येथील रमेश भ़ोसले यांचे अल्पशा आजाराने निधन
सुकेळी ( दिनेश ठमके) : मढाळी ( ता.रोहा ) येथिल अतिशय चांगल्या पद्धतींत व्यक्तीमत्व अससलेले व सर्वांना आवडणारे रमेश भोसले यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.सोमवार त्यांच्यावर सोमवार दि.६ ऑक्टोबर रोजी मढाळी येथिल़ वैकुंठ स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविंध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. रमेश भोसले यांचा अल्पपरिचय द्यायचा झाला
तर अतिशय मनमिळाऊ व आपुलकीची भावना करणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य. पंरतु अल्पशा आजाराने त्यांचे रविवारी निधन झाले.कै.रमेश भोसले यांच्या पश्चात २ मुलगे, एक मुलगी, सुना, जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि. १४ ऑक्टोबर रोजी तर बारावे गुरूवार दि. १६ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी मढाळी येथे करण्यात येणार असल्याचे भोसले परिवाराकडून सांगण्यात आले आहे.




