अपरिचित इतिहासकायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीण
भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात स्वातंत्र्यलढ्याच्या ठेव्याचे प्रदर्शन
प्रदर्शनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींना उजाळा

भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात स्वातंत्र्यलढ्याच्या ठेव्याचे प्रदर्शन
प्रदर्शनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींना उजाळा
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील शैक्षणिक संकुलात असलेल्या एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे” गुरुवारी (दि.१३) ओळख देश भक्तांची, शाळा तिथे क्रांती मंदिर” या उपक्रमा अंतर्गत भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या एका अनमोल ठेव्याचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याचे सचित्र दर्शन घडले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींना उजाळा मिळाला.

या कार्यक्रमात देशभक्त कोशाकार चंद्रकांत शहासने यांच्या संग्रहातील दहा हजार क्रांतीकारकांची माहिती असलेला देशभक्त कोश तसेच दोन हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील या अमूल्य ठेव्याच्या प्रदर्शनाचे ८१० दिवसांचे अभूतपूर्व अभियान ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपुढे स्वातंत्र्यलढ्याचा पट उघडला गेला. यावेळी चंद्रकांत शहासन यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या प्रदर्शनासाठी संस्थेचे सचिव सुरेश जैन, मुख्याध्यापिका अमृता गायकवाड यांच्यासहसंस्था समितीचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विजय शहासने, हरीश शहासने, विलास शहासने यांचे सहकार्य मिळाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सह शिक्षिका सुवर्णा विनोद पाटील यांनी केले.



