खेळमहाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक

एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिसांसह विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा सहभाग

नागोठणे पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित जिंदाल स्कूल मधील एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिसांसह विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा सहभाग

महेश पवार 

नागोठणे : देशाचे पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. विविध संस्थानांना एकत्र करून एक राष्ट्र बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा दिवस स्मरण करतो आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रचार करतो. त्यामुळेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र एकता दौडचे आयोजन करण्यात आलेले असतांनाच नागोठणे पोलिस ठाण्याचे वतीने नागोठणे विभागातील सुकेळी येथील जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये शुक्रवारी (दि.३१) सकाळी आयोजित केलेल्या एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पांढऱ्या रंगाचे टी शर्ट परिधान केले होते. या एकता दौड नंतर शाळेच्या सभागृहात विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हेगारी सुरक्षा व जनजागृती संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रोहाचे उप अधिक्षक प्रसाद गोकुळे व नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

जिंदाल स्कूलच्या भव्य मैदानात संपन्न झालेल्या या एकता दौड मध्ये रोहाचे पोलिस उपअधीक्षक प्रसाद गोकुळे, नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, उपनिरीक्षक नरेश थळकर, ऐनघर ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य मनोहरभाई सुटे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निखिल मढवी, जिंदाल स्कूलच्या प्रभारी प्राचार्या स्वागतिका साहू, प्रशासकीय अधिकारी के.के. पांडे, सूर्यकांत वर्मा, जयेश गुप्ता, संदीप पाटील, परेश पाटील, क्रीडा शिक्षक धनंजय महाडिक, शिक्षक ओमकार खाडे, दर्शना कुथे,  पोलिस कर्मचारी एस.एस. खेडेकर,  चंद्रकांत पाटील, अथर्व पाटील, स्वप्नील भालेराव, किरण ठाकूर, एस.एन. महाले, महिला पोलिस कर्मचारी साक्षी पाटील, वृषाली मांटे, ऐनघरचे माजी उपसरपंच रोहिदास लाड, श्रेया कुंटे, आनंद लाड, शेखर गोळे, निवृत्ती जंगले, धनराज उमाळे, तिरथ पोलिसानी, ज्ञानेश्वर शिर्के, जितेंद्र धामणसे, राजू कोकळे, जगन कोकळे आदींसह विद्यार्थी व शिक्षक या एकता दौड मध्ये सहभागी झाले होते.

माऊंट लिटेरा झी स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या भव्य मोकळ्या मैदानात सुमारे ८०० मीटर अंतरात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ही एकता दौड फिरविण्यात आली. राष्ट्रीय एकता दिनाचे बॅनर हातात घेऊन विद्यार्थ्यांनी या एकता दौड मध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!