आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण

फरमानशेठ दफेदार हे गोरगरिबांना मदत करणारे व्यक्तिमत्व होते

लायन्स क्लबच्या नेतेचिकित्सा शिबिरात ५२  रुग्णांची नेत्र तपासणी

फरमानशेठ दफेदार हे गोरगरिबांना मदत करणारे व्यक्तिमत्व होते : लियाकतशेठ कडवेकर

लायन्स क्लबच्या नेतेचिकित्सा शिबिरात ५२  रुग्णांची नेत्र तपासणी
महेश पवार 
नागोठणे : नागोठणे ग्रामपंचायतीचे दिवंगत माजी सरपंच फरमानशेठ दफेदार यांनी आपल्या सरपंच पदाच्या काळात नागोठण्यासाठी विविध बाबतीत भरीव कार्य केले. माझे चांगले मित्र असल्याने मी त्यांच्या कार्यात नेहमी सोबत असायचो. कोरोना काळ असो की, निसर्ग चक्रीवादळ त्यांनी सर्वत्र आपल्या परीने सहकार्य केले. त्यांनी केलेल्या मदतीमुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आजही त्यांचे गुणगान गातात. अशाप्रकारे फरमानशेठ दफेदार हे गोरगरिबांना मदत करणारे व्यक्तिमत्व होते अशा शब्दात नागोठण्याचे माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर यांनी फरमानशेठ दफेदार यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात फरमानशेठ दफेदार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी चार्टर्ड लायन्स प्रेसिडेंट घिसूशेठ जैन यांनीही फरमानशेठ यांच्या कार्याच्या काही आठवणी सांगितल्या.
नागोठणे शहरातील व्यावसायिक सद्दाम दफेदार, रमीज दफेदार आणि फजल दफेदार यांच्या सहकार्याने त्यांचे वडील आणि नागोठण्याचे माजी सरपंच फरमानशेठ दफेदार यांच्या  स्मरणार्थ आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटल नवीन पनवेल यांच्या सहकार्याने नागोठणे लायन्स क्लबने येथील शांतीनगर भागातील स्व. बाळासाहेब ठाकरे बाल उद्यानात आयोजित केलेल्या या शिबिरास चार्टड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, एम जे एफ लायन सुधाकर जवके, शिक्षण विभागाचे डिस्ट्रिक्ट चेअरमन, एम.जे.एफ लायन यशवंत चित्रे, झोनल चेअरमन एमजेएफ लायन विवेक सुभेकर, लायन्स क्लबचे उपाध्यक्ष विशाल शिंदे, लायन व नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, नागोठण्याचे उपसरपंच अखलाक पानसरे, बाळासाहेब टके, शब्बीर पानसरे, अशपाक पानसरे,  सिराजभाई पानसरे,  लायन दौलत मोदी, लायन विनोद सावंत, लायन सुजाता जवके, लायन सुनील कुथे, लायन विवेक करडे, लायन विजय शहासने,  लायन दीपक लोणारी, दीपक गायकवाड, आसिफ मुल्ला, सलीम कुरेशी, अलकाश कोरतकर, अशपाक सुमरा, आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटलच्या डॉ. सलोनी सुभेकर, ज्योती पाटील, नेहा कदम आदींसह अनेक मान्यवर व परिसरातील नागरिक नेत्र तपासणीसाठी यावेळी उपस्थित होते. यावेळी सद्दाम दफेदार यांनी नागोठणे लायन्स क्लबला २१ हजार रुपयांची देणगी व लियाकतशेठ कडवेकर यांनी २५ प्लास्टिक खुर्च्या देण्याचे जाहीर केले.
नागोठणे लायन्स क्लबने आत्तापर्यंतचे आयोजित केलेल्या शिबिरांच्या मानाने भव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या शिबिरात ५२ नागरिकांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली.  यामध्ये मोतिबिंदू आढळलेल्या १७ रुग्णांना  शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठविण्यात येणार आहे. यावेळी लायन यशवंत चित्रे यांनी मोतीबिंदू शास्त्रक्रिये नंतरची डोळ्यांची निगा व काळजी याविषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती उपस्थित नागरिकांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी केले.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!