खेळमहाराष्ट्र ग्रामीण

नागोठण्यातील रिलायन्स मैदानात रंगणार महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा सामना 

कूच बिहार ट्रॉफीचा सामना १६ ते १९ नोव्हेंबरला 

नागोठण्यातील रिलायन्स मैदानात रंगणार महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा सामना 

कूच बिहार ट्रॉफीचा सामना १६ ते १९ नोव्हेंबरला

महेश पवार 

नागोठणे : रायगडमधील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  देशातील अव्वल तरुण क्रिकेटपटूंना घडवणारी प्रतिष्ठेची कूच बिहार ट्रॉफी आता थेट नागोठणे येथील रिलायन्स निवासी संकुलातील मैदानावर रंगणार आहे. १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान रिलायन्स क्रिकेट स्टेडियमवर महाराष्ट्र विरुद्ध ओडिशा हा चार दिवसीय सामना रंगणार असून, रिलायन्स प्रशासनाने या लढतीसाठी संपूर्ण मैदान झळाळून तयार केलं आहे.

रिलायन्स नागोठणे विभागाचे अध्यक्ष शशांक गोयल, कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रमुख पुनीत मिश्रा, हॉर्टिकल्चर प्रमुख शरद पवार यांच्यासह जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांनी नुकतीच मैदानाची पाहणी केली. खेळपट्टीपासून पॅव्हेलियनपर्यंत आणि सुरक्षा व्यवस्थेपासून मैदानाच्या सौंदर्यपर्यंत, सर्वकाही बीसीसीआयच्या निकषांनुसार सज्ज केलं गेलं आहे की, नाही याची चाचपणी यावेळी करण्यात आली.

या स्पर्धेतून अनेक तरुण खेळाडू भारतीय संघापर्यंत पोहोचतात, त्यामुळे नागोठण्यातील हा सामना केवळ एक क्रिकेट इव्हेंट नसून रायगडच्या तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा देणारा क्षण ठरणार आहे.

स्थानिक क्रिकेट अकॅडमीतील खेळाडूंसाठी हा सामना म्हणजे ‘प्रत्यक्ष मैदानावर शिकण्याचे वर्ग’ च ठरणार असल्याचे बोलले जात आहे.  सर्व क्रिकेटप्रेमींना हा सामना विनामूल्य पाहण्याचं आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!