महाराष्ट्र ग्रामीणराजकारण

संतोषभाई  कोळी यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा 

राष्ट्रवादीच्या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची चाचपणी

राजिप नागोठणे गटासाठी संतोषभाई  कोळी यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा 

राष्ट्रवादीच्या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची चाचपणी
महेश पवार 
नागोठणे : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  महायुतीचा घटक असलेल्या भाजपा व शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावाची निश्चिती स्थानिक पातळीवरील  कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. असे असतांनाच नागोठणे विभागात महायुतीचा नागोठणे विभागातील महत्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही पक्षाचे नागोठणे विभागीय नेते भाई टके यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि. ३१) एक महत्वपूर्ण बैठक घेऊन उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. यावेळी विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी मार्गदर्शन करीत असतांनाच पक्षाचे ज्येष्ठ नेते व रोहा पंचायत समितीचे माजी सदस्य हरेशशेठ काळे यांनी संतोषभाई कोळी यांना उद्देशून जिल्हा परिषदेची स्वतःची उमेदवारी घोषित करा असे वक्तव्य केल्याने उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी नागोठणे गटासाठी संतोषभाई कोळी यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा दिला. याचबरोबर रोहा पंचायत समितीच्या सुकेळी व नागोठणे गणा साठीही इच्छुकांची चाचपणी करण्यात आली.
रोहा पंचायत समितीच्या सुकेळी गणासाठी अनुसूचित जमाती स्त्री आरक्षण असल्याने वणी ग्रामपंचायत मधील काळकाई येथील नामी महेंद्र हंबीर, कडसुरे ग्रामपंचायत मधील कागदावाडी येथील सोनी बाळ्या पिंगळा व वांगणी ग्रामपंचायत मधील उनाठवाडी येथील सोनी किसन शिद तसेच नागोठणे गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आरक्षण असल्याने  पिगोंडे ग्रामपंचायत मधील वेलशेत येथील नेत्रा रोशन पारंगे यांची नावे कार्यकर्त्यांनी सुचविली. त्यामुळे पंचायत समितीला सुकेळी गणात अनेक इच्छुक असल्याने आणि नागोठणेसाठी आणखी इच्छुक उमेदवार पुढे येण्याची शक्यता असल्याने उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय पक्ष श्रेष्ठींना घ्यावा लागणार आहे.
या सभेला राष्ट्रवादीचे नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, मधुकर ठमके,  हरीशशेठ काळे, विलास चौलकर, 
डॉ. राजेंद्र धात्रक,  विभागीय अध्यक्ष संतोष कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके,  युवक विभागीय अध्यक्ष प्रमोद जांबेकर, कृष्णाजी धामणे, चंद्रकांत गायकवाड, प्रकाशशेठ जैन, अनिलशेठ काळे, सुधाकर पारंगे, राजेंद्र शिंदे, सचिन कळसकर,  निवास पवार, मनोज टके, चेतन टके, प्रथमेश काळे, महेंद्र हंबीर, रोशन पारंगे, मंगेश तेरडे, रोहिदास हातनोलकर, रविंद्र वाजे, प्रकाश रेवाळे,  अमित जांबेकर, बिपीन सोष्टे, किसन भोय, भारत भोय, चंद्रकांत कामथे, अंकुश ताडकर, विजय पारंगे, मिलिंद गुरव, प्रमोद पारंगे, सुजाता जवके, प्रतिभा तेरडे, पुनम काळे, प्रगती आवाद, सखुबाई पिंगळा आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे विभागीय नेते नरेंद्र जैन यांनी आपल्या मनोगतात, मी पाच निवडणूक लढविल्या. आपल्याच आशीर्वादाने जिल्हा परिषद सदस्यही  झालो. तरीही मागील निवडणुकीतील आपल्याच लोकांकडून कटू अनुभव आल्याचे सांगितले. पेण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विलास चौलकर यांनी मागील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पराभवाची भर काढण्यासाठी उमेदवार कुणीही असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी घेण्यास सांगितले. ज्येष्ठ नेते मधुकर ठमके यांनी आपले उमेदवार लवकर नक्की करावे त्यामुळे प्रचारात फरक पडतो हे सांगतानाच ऐनघर भागात तरुणांनी पक्ष संघटन वाढविण्याची सूचना केली. विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी यांनी आपल्या मनोगतात निवडणूक कार्यक्रमा आधीच आपण प्रत्येक मतदारापर्यंत पोचले पाहिजे. पूर्वतयारी करून स्वबळाची ताकद आपण ठेवली पाहिजे असे सांगितले.  या सभेचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे विभागीय सचिव राजेंद्र शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!