धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण
श्री आकादेवी मातेच्या पुन: प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे उद्धव ठाकरे यांना आमंत्रण

श्री आकादेवी मातेच्या पुन: प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे उद्धव ठाकरे यांना आमंत्रण
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील शेतपळस (ता. रोहा) येथील आराध्य ग्रामदेवता श्री आकादेवी मातेच्या पुन: प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे भव्य आयोजन शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर ते रविवार दिनांक ३० नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. यानिमित्त शेत पळस ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच मातोश्री येथे जाऊन आमंत्रण देण्यात आले.
आई अक्कादेवी मातेच्या पुन: प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची निमंत्रण पत्रिका उद्धव ठाकरेंना देण्यासाठी उरणचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शेतपळस गावचे सामाजिक कार्यकर्ते हासुराम डाकी, पोलीस पाटील केशव डाकी, नितीन घासे, पळसचे उपशाखाप्रमुख विक्रम दुर्गावले, युवा नेते प्रशांत भोईर आदी उपस्थित होते.
आई आकादेवी मंदिर व परिसर शुशोभीकरणासाठी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख आणि राजिपचे माजी सदस्य किशोर शेठ जैन यांच्या प्रयत्नाने तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निधीतून आई आकादेवी मंदिरासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आणि त्या निधीतून सुशोभीकरणाचे काम अद्यावत पद्धतीने सुरू असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंदिरात येऊन मातेचे दर्शन घ्यावे अशी आग्रहची विनंती शेतपळस ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे.




