सुकेळी येथील महाराष्ट्र सिमलेस कंपनीत दोन दिवसीय भव्य रामलीला कार्यक्रमाचे आयोजन
रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांची उपस्थिती

सुकेळी येथील महाराष्ट्र सिमलेस कंपनीत दोन दिवसीय भव्य रामलीला कार्यक्रमाचे आयोजन
रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांची उपस्थिती
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील सुकेळी येथील महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड कंपनीच्या मैदानात जिंदल कुटुंबीया तर्फे श्री रामलीला मंचनचे आयोजन ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर या दोन दिवस करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.३१) संध्याकाळी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिंदल कुटुंबियांच्या वतीने कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साकेत जिंदल, श्रीमती रचना साकेत जिंदल, कुमारी श्रीप्रिया जिंदल, कुमारी श्रीजा जिंदल, कंपनीचे प्रेसिडेंट शिवकुमार सिंघल, व्हॉईस प्रेसिडेंट संजीव बॅनर्जी, वरिष्ठ अधिकारी एस के. यादव, के. के. पांडे यांच्यासह कंपनीचे इतर अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग तसेच कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवी दिल्ली येथील श्री राम भारतीय कला केंद्र तर्फे हा दोन दिवसांचा रामलीला कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. शनिवारी (दि.१) रात्री या रामलीला कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे. या रामलीला कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र सिमलेस कंपनीत धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.





