तांत्रिकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारणशैक्षणिक

जे.एस.डब्ल्यू. अ‍ॅस्पायर प्रकल्पांतर्गत वर्तणूक व्यवस्थापन प्रणाली भित्तिचित्राचे अनावरण

जे.एस.डब्ल्यू. अ‍ॅस्पायर प्रकल्पांतर्गत वर्तणूक व्यवस्थापन प्रणाली भित्तिचित्राचे अनावरण

महेश पवार
नागोठणे : जे.एस.डब्ल्यू.अ‍ॅस्पायर आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील पेण व अलिबाग तालुक्यांमधील २६ शाळांमध्ये जे.एस.डब्ल्यू.अ‍ॅस्पायर प्रोजेक्ट डोलवी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कोलघर तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा, सांबरी येथे वर्तन व्यवस्थापन प्रणाली (Behavioural Management System – BMS) या भित्तिचित्राचे अनावरण करण्यात आले.
हे भित्तिचित्र पाहिल्यानंतर आदर्श व गुणी विद्यार्थी तसेच सुजाण नागरिक कसा असावा याचा बोध विद्यार्थ्यांना होतो. या भित्तिचित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आदर्श व शिस्तबद्ध वर्तन, चांगल्या सवयी, जबाबदारीची जाणीव तसेच सुजाण नागरिक म्हणून घडण्यासाठी आवश्यक मूल्यांची ओळख करून देण्यात येते. भित्तिचित्र पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना योग्य वर्तनाचे महत्त्व सहज समजण्यास मदत होते.
या भित्तिचित्राच्या उद्घाटनप्रसंगी कोलघर येथे शाळेचे मुख्याध्यापक सतीश शेरमकर,  सुनिता दांडेकर,  तेसीराम वाक,  प्रकाश तिवरे, स्वाती पाटील, जगदीश  मेंगाल, सुषमा डी. म्हात्रे (आरोग्य शिक्षिका),  अर्चना बी. रामटेक (क्रीडा शिक्षिका),  वर्षाराणी. कानवटे, सौ. सुनिता गडखळ ,(ANM),  वैशाली पाटील,  सखाराम निरगुडे, दिनेश डोळकर (क्लार्क),  स्नेहल पाटील (अधीक्षका) तर ज़िल्हा परिषद शाळा सांबरी येथे संगीता पाटील (मुख्याध्यापिका), सरिता राजेश पाटील (अध्यक्ष), माधवी लक्ष्मण करव (उपाध्यक्ष), कपाली शेलके (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य), प्रशांत पाटील (ग्रामपंचायत सदस्य), शमा शरद बोरकर व पद्मा सोटे (इमपावर फौंडेशन शिक्षक व कर्मचारी, जे एस डब्ल्यू च्या ग्राम समन्व्यक संगीता टेमकर, ललिता लांगी, निलम बोरकर हे सर्व उपस्थित होते.
दोन्हीही वॉल पेंटिंगच्या उद्घाटन कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व सूत्रसंचालन बालपंचायत सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने पार पाडले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, स्थानिक लोकप्रतिनिधी व पालक वर्गाकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे..
या दोन्हीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बसच्या गंगोत्री पाटील, निखिल गावंड, सिद्धार्थ कांबळे व डॉ. प्रगती पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!