धार्मिक सोहळानिधनमहाराष्ट्र ग्रामीण

नागोठण्यातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर महाडिक यांना मातृशोक 

"भक्तीन" आईच्या निधनाने पंचक्रोशी मध्ये हळहळ

नागोठण्यातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर महाडिक यांना मातृशोक 

“भक्तीन” आईच्या निधनाने पंचक्रोशी मध्ये हळहळ

महेश पवार

नागोठणे : रोहा जवळील धामणसई गावच्या रहिवासी आणि गावातील महिला मंडळाच्या प्रमुख आधारस्तंभ तसेच जुन्या चाळी रीती व धार्मिक विधी यांची जाण असलेल्या, वयाची शंभरी पार केलेल्या गावातील एकमेव महिला आणि पंचक्रोशीत सर्वत्र “भक्तीन आई” या नावाने परिचित असलेल्या, धार्मिक व सेवाभावी अशा लक्ष्मीबाई पांडुरंग महाडिक (वय १०३) यांचे नुकतेच वयोवृद्धत्वामुळे निधन झाले

मूळचे धामणसई व व्यवसायानिमित्त नागोठणे येथे स्थाईक झालेले मराठी उद्योजक व सदैव मदती साठी तत्पर असलेले, सर्व गोरगरिबांच्या सुख दुःखा मध्ये धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते मधुकर महाडिक आणि नंदकुमार महाडिक यांच्या त्या मातोश्री होत. भक्तीन आई लक्ष्मीबाई महाडिक यांच्या निधनाने पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे नंदकुमार, मधुकर, सुना नीता नंदकुमार महाडिक, नागोठणे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या माधवी मधुकर महाडिक, मुलगी योगिता यशवंत तटकरे, जावई, नातवंडे, पातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.

लक्ष्मीबाई महाडिक यांनी वयाची शंभरी पार केल्यानंतरही त्यांची प्रकृती व्यवस्थित व आवाज खणखणीत होता.  त्या नेहमी गरजवंताना मदतीचा हात देत व योग्य मार्गदर्शन करीत असत.  मनमोकळा स्वभाव आणि परोपकारी वृत्ती व सुप्रसिद्ध भक्तिण आई म्हणून त्यांची धामणसई, पिंगळसई, गावठाण, सोनगाव, मालसई, मुठवली, वादोली, मढाली सागडे, खांब पर्यंत सर्वदूर ख्याती होती. दिवंगत लक्ष्मीबाई महाडिक यांच्या अंत्य यात्रेला महाडिक यांचे नातेवाईक, सगेसोयरे, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवंगत लक्ष्मीबाई महाडिक यांचे उत्तरकार्य बुधवार  दिनांक १७ डिसेंबर रोजी राहत्या घरी धामणसई येथे होणार असून त्यानिमित्त वांदोली येथील ह.भ.प.दिनेश महाराज कडव  यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेचे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांचा मुलगा मधुकर महाडिक यांनी दिली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!