महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक

शैक्षणिक जीवनात धैर्य आणि चिकाटी असावी : मनोजदादा खांडेकर 

श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक शाळेच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

शैक्षणिक जीवनात धैर्य आणि चिकाटी असावी : मनोजदादा खांडेकर 

श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक शाळेच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 
महेश पवार 
नागोठणे : मी शिवसेनेचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझेही प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतूनच आणि माध्यमिक शिक्षण कानसई येथील याच तटकरे हायस्कूल मधून झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा व तेथील विद्यार्थ्यांना काहीही कमी पडता कामा नये ही माझी भावना असून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी न समजता आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपले नावलौकिक मिळवावे.  यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात धैर्य आणि चिकाटी असावी तर त्यांनाही यश दूर नाही असा मोलाचा सल्ला शिवसेना रोहा उप तालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कानसई येथील श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक हायस्कूल मधील शैक्षणिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मनोजदादा खांडेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  या क्रिडा स्पर्धेच्या  उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेना रोहा उपतालुकाप्रमुख व श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी मनोजदादा खांडेकर यांच्यासह श्रीमती गीता द. तटकरे हायस्कूलचे मुख्याध्यापक वाघ सर, पाटील मॅडम, माजी विद्यार्थी संजय कणघरे, माजी विद्यार्थी विशाल शिरसे, संदिप वाजे, राज दुर्गावले, मयूर ढाणे, विनेश ढाणे, उत्तम हारपाल आदींसह गीता द. तटकरे माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!