महाराष्ट्र ग्रामीणराजकारण

युवा नेते मनोजदादा खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली  नागोठणे विभागात शिवसेनेत जोरदार इनकमिंग

नागोठणे जिल्हा परिषद निवडणूक होणार रंगतदार

युवा नेते मनोजदादा खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली  नागोठणे विभागात शिवसेनेत जोरदार इनकमिंग
नागोठणे जिल्हा परिषद निवडणूक होणार रंगतदार 
महेश पवार 
नागोठणे : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने तसेच राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले व दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आणि रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, उप तालुका प्रमुख व नागोठणे विभागासह रोहा तालुक्यातील युवा नेते मनोजदादा खांडेकर,  युवा उद्योजक सुमितदादा काते यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे विभागात शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे दिसून येत आहे. नागोठणे विभागात शिवसेनेची तागद वाढत असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणूक नागोठणे गटात रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
नागोठणे विभागातील ऐनघर पंचक्रोशी, वेताळवाडी,
नागोठणे शहर, पळस, वांगणी या भागातील प्रवेशानंतर कोंडगाव मध्ये विजय धामणे यांच्या नेतृत्वाखाली झालेला तरुणांचा व कार्यकर्त्यांचा प्रवेश यांसह विभागातील इतर अनेक गावांतील तरुण वर्ग व इतर पक्षीय कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात प्रवेश केलेला आहे. असे असतांनाच नागोठण्याजवळील वणी गावातील अनेक तरुणांनी व कार्यकर्त्यांनी युवा नेते मनोजदादा खांडेकर यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर रोजी शिवसेनेच्या नागोठण्यातील कार्यालयात शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या प्रवेशामुळे नागोठणे विभागात शिवसेनेत उत्साह निर्माण झाला असून तरुण वर्गाच्या वाढत्या प्रवेशामुळे पक्षाला नक्कीच बळकटी मिळणार आहे तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, युवा उद्योजक सुमितदादा काते यांच्यासह कार्यकर्त्यांनी यांनी व्यक्त केला आहे. 
या प्रवेश सोहळ्यास ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन भोसले, युवासेना तालुका सचिव मंदार कोतवाल, कडसुरे शाखाप्रमुख भानुदास शिंदे, नागोठणे विभाग संपर्कप्रमुख संजूदादा कणघरे, युवासेना उपतालुका प्रमुख विशाल शिरसे, युवासेना उपविभाग प्रमुख प्रसाददादा जाधव, युवासेना शहर अधिकारी संदीप वाजे, युवासेना उपविभाग अधिकारी राज दुर्गावले व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेश कर्त्यांमध्ये वणी गावातील माजी उपसरपंच  विठोबा जाधव, माजी सरपंच जयेश जाधव, रमेश वनकर, मनोहर खामगावकर, नारायण धसाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वणी गावातील सौरभ खामगावकर, सुमित रेवाळे, प्रथमेश कदम, भारत आवाद, रोहन रेवाले, दिपेश पांडे, ऋग्वेद आवाद, आदेश मांडलुस्कर, सन्नी मांडलूस्कर,आर्यन मांडलुस्कर, ऋषिकेश पाठारे, दिपेश दिघे, तेजस गुजर, अरुण रेवाळे, भूषण घोगरे, सार्थक राऊत, आयुष भोस्तेकर, विघ्नेश कदम, साहिल राणे, आर्यन आवाद, रुद्र आवाद, दुर्वेश दिघे, महेश वनकर या तरुणांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे मनोजदादा खांडेकर यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले व त्यांना पक्षात योग्य मानसन्मान मिळेल याची ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!