निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणमहिला विशेषराजकारण

जिल्ह्यात कुठेही नसेल असे प्रशिक्षण केंद्र नागोठण्यात महिलांसाठी उभारणार 

नागोठण्यातील महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यात कुठेही नसेल असे प्रशिक्षण केंद्र नागोठण्यात महिलांसाठी उभारणार 

महिला मेळाव्यात आदितीताई तटकरे यांची ग्वाही
किशोर जैन व समृद्धी कोळी यांचा विजय निश्चित झाल्याचा आदितीताईंचा विश्वास
नागोठण्यातील महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
महेश पवार 
नागोठणे : प्रत्येक घरातील आई व लेकीप्रमाणेच प्रत्येक घटकातील महिला सक्षम झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळेच लाडकी बहीण योजना राबविताना कोणतेही जातीभेद न मानता सर्व महिलांना याचा लाभ दिला.  महायुतीच्या मंत्रिमंडळात एकमेव महिला मंत्री असताना मला ही ही महत्वकांक्षी योजना राबविण्याची संधी मिळाली. त्यामुळे महायुती सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून विरोधकांच्या खोट्या  प्रचाराला आणि भूलथापांना बळी पडू नका. सर्व जाती-धर्माच्या घटकातील महिलांना एकत्र घेऊन काम करणे ही आमची भूमिका आहे. आज हळदी कुंकू किंवा होम मिनिस्टर सारखा खेळ नसतानाही महिलांची दुप्पट गर्दी झाली ही विजयाची नांदी आहे. जिल्हा परिषदेचे नागोठणे गटाचे उमेदवार किशोरभाई जैन यांना जिल्हा परिषदेतील कामाचा अनुभव आहे. पंचायत समितीच्या उमेदवार समृद्धीताई कोळी यादेखील महिलांचे नेतृत्व करू शकणाऱ्या उमेदवार आहेत. हे कॉम्बिनेशन जुळले तर जिल्ह्यात कुठे झाला नसेल एवढा नागोठणे विभागाचा विकास होणार असून जिल्ह्यात कुठेही नसेल असे प्रशिक्षण केंद्र नागोठण्यात महिलांसाठी उभारणार असल्याची ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या  नागोठण्यातील महिला मेळाव्यात व प्रचार सभेत दिली.
रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किशोरशेठ जैन व रोहा पंचायत समितीच्या नागोठणे गणाच्या समृद्धी कोळी यांच्या प्रचारार्थ नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या भव्य प्रांगणात सोमवारी(दि.२६) सायंकाळी संपन्न झालेल्या या महिला मेळाव्याला
आदितीताई तटकरे यांच्यासह उमेदवार किशोरशेठ जैन, समृद्धी कोळी, विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, विलास चौलकर, संजय भोसले, विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस आशा शिर्के, जिल्हा उपाध्यक्षा अमिता शिंदे, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी
निष्ठा विचारे, सुजाता जवके, प्रतिभा तेरडे, संगीता जैन, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सदस्या पूनम काळे, सुप्रिया काकडे, अमृता महाडिक, भाविका गिजे, विनिता पाटील, सौ. मीनाक्षी जांबेकर, प्रगती आवाद आदींसह राष्ट्रवादी व भाजपा युतीच्या महिला पदाधिकारी तसेच शहर व विभागातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जिल्हा परिषदेचे उमेदवार किशोरशेठ जैन म्हणाले की, आदितीताई तुमचा पायगुण चांगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची युती आजच जाहीर झाल्याने दुधात साखर पडली आहे. विरोधकांचा समाचार घेताना किशोर शेठ म्हणाले की, समोरचे नवीन असून क्रिकेट, कबड्डी मधून त्यांचा काय खेळ चाललाय ते त्यांना खेळू द्या. क्रिकेट व कबड्डी हे मला नवीन नसून ते येथे किशोर जैननेच सुरू केले आहेत. कुणीतरी यायचे आणि येथे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे एवढी ही निवडणूक सोपी नाही. सर्व महिलांसाठी आदितीताई प्रभावीपणे काम करीत असल्यानेच महिलांची प्रचंड गर्दी या मेळाव्याला झालेली असून ज्या पक्षाकडे महिला आहेत त्यांचा कधीही पराभव होऊ शकत नाही असेही यावेळी किशोरशेठ यांनी ठामपणे सांगितले.
रोहा पंचायत समितीच्या उमेदवार समृद्धी कोळी यांनी आपल्या मनोगत सांगितले की, तटकरे कुटुंबीयांनी नेहमीच महिलांना पुढे आणण्याचे काम केले आहे. मलाही त्यांनी संधी दिल्याने त्या संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न करेन असे बोलून त्यांनी किशोर शेठ व त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थित महिलांना केले. या मेळाव्यात सदानंद गायकर, श्रेया कुंटे, अमिता शिंदे, निष्ठा विचारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या महिला मेळाव्याचे सूत्रसंचालन संजय काकडे व प्रकाश कांबळे यांनी तर आभारप्रदर्शन नागोठणे ग्रामपंचायतीच्या सदस्या पूनम काळे यांनी केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!