निधनमहाराष्ट्र ग्रामीण

मालती गायकर यांचे अल्पशा आजाराने निधन

मालती गायकर यांचे अल्पशा आजाराने निधन

महेश पवार 

नागोठणे : नागोठण्याजवळील आमटेम (ता. पेण) गावातील रहिवासी व अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या असलेल्या तसेच आमटेम गावातील महिला मंडळाच्या प्रमुख आधारस्तंभ सौ. मालती हिरामण गायकर (वय ६२) यांचे सोमवार दिनांक १९ जानेवारी रोजी कळंबोली (नवी मुंबई) येथील एम.जी.एम.रुग्णालयात अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. दिवंगत मालती गायकर यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी आमटेम येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गायकर यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्रपरिवार तसेच आमटेम गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालती गायकर यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कै. मालती गायकर यांच्या पश्चात पती हिरामण गायकर, चार विवाहित मुलगे किशोर, गोकुळ, रोशन, चेतन, सुना, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. कै. मालती गायकर यांचे दशक्रिया विधी बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी उद्धर येथे तर उत्तरकार्य शनिवार दिनांक ३१ जानेवारी रोजी आमटेम येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती गायकर परिवाराकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!