निधनमहाराष्ट्र ग्रामीण

मारुती खरडे यांचे अल्पशा आजाराने निधन 

मारुती खरडे यांचे अल्पशा आजाराने निधन 

महेश पवार 
नागोठणे : नागोठण्यातील आय टी आय कॉलेज समोरील शुभ लक्ष्मी अपार्टमेंट (ए विंग रुम नं.२०१) या इमारतीमधील रहिवासी
मारुती यादवराव खरडे (वय ७५) यांचे गुरुवार दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी ९  वाजण्याच्या सुमारास कळंबोली (नवी मुंबई) येथील एम.जी.एम. रुग्णालयात अल्पशा आजाराने उपचारादरम्यान  निधन झाले. नागोठण्यातील बांधकाम व्यावसायिक दत्ता खरडे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात आशा ही एक विवाहित मुलगी, दत्ता व  दिगंबर हे दोन विवाहित मुलगे, जावई, सुना, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. अनेक वर्षे मुनिम म्हणून काम केलेल्या मारुती खरडे यांना वर्तमान पत्र व इतर वाचनाची खुप
आवड होती. तसेच ते स्वभावाने अतिशय प्रेमळ असल्याने त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दिवंगत मारुती खरडे यांच्या पार्थिवावर गुरुवारीच (दि.१५) रात्री नागोठण्यातील अंबा घाटावरील वैंकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खरडे यांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नागोठण्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. मारुती खरडे यांचे दशक्रिया विधी शनिवार २४ जानेवारी रोजी श्री क्षेत्र उद्धर(ता.सुधागड) येथे तर उत्तरकार्य मंगळवार २७ जानेवारी रोजी नागोठण्यातील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती खरडे कुटुंबियांकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!