निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण

मिरानगर ग्रामस्थांना हक्काची घरे मिळवून देणार :  किशोरभाई जैन 

मिरानगर ग्रामस्थांचा किशोरभाई जैन यांना पाठिंबा 

मिरानगर ग्रामस्थांना हक्काची घरे मिळवून देणार :  किशोरभाई जैन 

मिरानगर ग्रामस्थांचा किशोरभाई जैन यांना पाठिंबा 
रायगडचा बुलंद आवाज टीम 
नागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मिरानगर भागाचा आम्ही गेले २५ वर्ष विविध स्तरावर विकास करत आलेलो आहोत.  त्यामुळे मिरानगर ग्रामस्थ प्रत्येक निवडणुकीत आम्हाला सहकार्य करीत आलेले आहेत. आता जिल्हा परिषद निवडणुकी नंतर खासदार सुनिल तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिरानगर गावठाण मध्ये वनखात्याचा जो शिक्का लागलेला तो बाहेर काढून ग्रामस्थांना त्यांची हक्काची घरे मिळवून देणार असल्याचे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीचे नागोठणे जिल्हा परिषद उमेदवार किशोरभाई जैन यांनी मिरानगर ग्रामस्थांना दिले.
किशोरभाई जैन यांच्या नागोठण्यातील कार्यालयात किशोरभाई जैन यांची भेट घेऊन गुड्डू पानसरे, समिर कुरेशी, इकबाल हमदुले, बबलू पटेल, अबू पानसरे, राजू नेरेकर, भाई मसालेवाले, अकबर मसालेवाले, असिफ मसालेवाले आदी मिरानगर ग्रामस्थांनी किशोरभाई जैन यांना पाठिंबा दिला त्यावेळी किशोरभाई जैन यांनी त्यांना अभिवचन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असगर मुल्ला, बबलू खंडागळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!