आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे लायन्स क्लबच्या शिबिरात ७२ रुग्णांची डोळे तपासणी
नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नागोठणे लायन्स क्लबच्या शिबिरात ७२ रुग्णांची डोळे तपासणी : मोतीबिंदू आढळलेल्या २३ रुग्णांवर शस्त्रक्रिया
नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
महेश पवार
नागोठणे : नागोठणे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष पांडुरंग उर्फ पी. के. शिंदे यांनी आपले वडील ह. भ. प. वै. कृष्णा पां. शिंदे व आई ह. भ. प. वै. द्रौपदी कृष्णा शिंदे
यांच्या स्मरणार्थ आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटल, नवीन पनवेल यांच्या सहकार्याने नागोठणे लायन्स क्लबने येथील शांतीनगर भागातील स्व. बाळासाहेब ठाकरे बाल उद्यानात बुधवारी(दि.७) आयोजित केलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरात ७२ नागरिकांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केल्याने या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये मोतिबिंदू आढळलेल्या २१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले.
या शिबिरात नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन सखाराम ताडकर, चार्टड प्रेसिडेंट लायन प्रकाश(घिसूशेठ) जैन, शिक्षण विभागाचे डिस्ट्रिक्ट चेअरमन, एम.जे.एफ लायन यशवंत चित्रे, झोनल चेअरमन एमजेएफ लायन विवेक सुभेकर, सेक्रेटरी लायन डॉ.अनिल गिते, उपाध्यक्ष लायन विशाल शिंदे, लायन व नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, लायन दौलत मोदी, लायन पांडुरंग शिंदे, लायन विजय शहासने, लायन संतोष शहासने, लायन दीपक गायकवाड, लायन सिद्धेश काळे, सौ. पूजा पांडुरंग शिंदे आदींसह अनेक मान्यवर व परिसरातील नागरिक नेत्र तपासणीसाठी यावेळी उपस्थित होते.
यावेळी यशवंत चित्रे यांनी आपल्या मनोगतात लायन पांडुरंग शिंदे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली आणि त्यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्याचे मोलाचे सामाजिक कार्य केल्याचे सांगितले. यावेळी लायन डॉ.अनिल गीते यांनी मोतीबिंदू शास्त्रक्रिये नंतरची डोळ्यांची निगा व काळजी याविषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती उपस्थित नागरिकांना दिली. या शिबिराच्या निमित्ताने स्व. बाळासाहेब ठाकरे बाल उद्यानातील नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट पत्र्याच्या शेडचा मजुरीचा खर्च लायन्स क्लबचे अध्यक्ष सखाराम ताडकर यांनी स्वतः केल्याने ला. विलास चौलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी केले. हे नेत्रचिकित्सा शिबिर यशस्वी होण्यासाठी आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटलच्या समुपदेशक ज्योती पाटील, नेत्रचिकित्सक स्वप्ना राणे, अर्पिता जाधव, आशा सेविका निधी जांबेकर यांनी सहकार्य केले.




