महाराष्ट्र ग्रामीणराजकारण

नागोठणे विभागातील चेराटी–काळकाई येथील  कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश 

नागोठणे विभागात शिवसेनेत इनकमिंग सुरूच 

नागोठणे विभागातील चेराटी–काळकाई येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश 

नागोठणे विभागात शिवसेनेत इनकमिंग  सुरूच 
महेश पवार 
नागोठणे : शिवसेनेचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने तसेच राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले व आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आणि रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, उप तालुका प्रमुख व नागोठणे विभागासह रोहा तालुक्यातील युवा नेते मनोजदादा खांडेकर,  युवा उद्योजक सुमितदादा काते यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे विभागातील वणी ग्रामपंचायत हद्दीतील वणी, काळकाई वाडी, चेराटी वाडी येथील ग्रामस्थांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेश कर्त्यांचे भारतशेठ यांनी पक्षात स्वागत करून त्यांना पक्षात मानसन्मानाची ग्वाही दिली.
नागोठण्यातील विविध गावांतील कार्यकर्त्यांचा व नागरिकांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढत असल्याने शिवसेना पक्षात उत्साह निर्माण झाला आहे.  या सर्वांच्या प्रवेशाने शिवसेना पक्षाला नक्कीच बळकटी मिळणार आहे तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यास मदत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
नागोठण्यातील शिवसेना पक्ष कार्यालयाच्या
सभागृहात संपन्न झालेल्या या प्रवेश सोहळ्यास शिवसेना नागोठणे विभाग प्रमुख प्रविण ताडकर, शहर प्रमुख संतोष चितळकर, विभाग संघटक दिनेश घाग, महिला आघाडी उपतालुका प्रमुख वर्षा सहस्रबुद्धे, मेढा विभाग प्रमुख सानिका करंजे, कोलाड विभाग प्रमुख गीता गुरव, उपविभाग प्रमुख आकाश मढवी, उपविभाग प्रमुख विश्वनाथ शिर्के, ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन भोसले, वणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयेश जाधव, प्रकाश डोबले, विजय धामणे, आप्पा शिर्के, महादेव दळवी, प्रसाद जाधव, मंदार कोतवाल, राज दुर्गावले,  सुनिल ढाणे, संदिप वाजे, विशाल शिरसे, अनिता पासमान, पुनम राम देवी, मोनी पाच मार्क, रिंकूदेवी चौधरी, मानसी शिंदे, करुणा मढवी, गीतादेवी राय, रुची पंडित, पुष्पा मढवी आदींसह सर्व कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!