निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण
नागोठण्यात सुमित काते यांचा जलवा : शेकाप कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

नागोठण्यात सुमित काते यांचा जलवा : शेकाप कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
रायगडचा बुलंद आवाज टीम
नागोठणे : शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन, नामदार भरतशेठ गोगावले व दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोज कुमार शिंदे यांच्या सूचनेनुसार व शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर व नागोठणे जिल्हा परिषद निवडणुकीचे उमेदवार सुमितदादा काते यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून नागोठण्याजवळील वरवरठणे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये समाविष्ठ असलेल्या पंचशील नगर मधील शेकापचे विद्यमान सदस्य व युवा नेतृत्व रोशन दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली स्वप्निल मोरे, ऋतिक दाभाडे, राकेश दाभाडे, सतेज दाभाडे, आकाश पवार, विकास गवळी, नयन गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून सुमितदादा काते यांना वरवठणे गावातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या परिस्थितीत नागोठणे जिल्हा परिषदेचे उमेदवार सुमितदादा काते यांचा नागोठणे विभागात जलवा पाहवयास मिळत आहे. या प्रवेश सोहळ्या प्रसंगी रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, अशोकशेठ कोतवाल, खेळू खांडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या पक्ष प्रवेशामुळे वरवठणे गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम झाली आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठे बळ मिळाले असल्याचे रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.




