निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण

नागोठण्यातून राष्ट्रवादीचे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल 

वाहनांचा प्रचंड ताफा पाहून विजय निश्चित झाल्याची चर्चा 

नागोठण्यातून राष्ट्रवादीचे किशोरशेठ जैन, समृद्धी कोळी, नामी हंबीर यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल 

श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन नागोठण्यात काढली भव्य रॅली 
वाहनांचा प्रचंड ताफा पाहून विजय निश्चित झाल्याची चर्चा 

महेश पवार 
नागोठणे : रायगड जिल्हा परिषदेच्या ३९ नागोठणे गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार किशोरशेठ जैन आणि रोहा पंचायत समितीच्या ७८ नागोठणे गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागेसाठी राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी यांच्या पत्नी सौ. समृद्धी संतोष कोळी यांनी आपले नामनिर्देशनपत्र बुधवारी (दि.२१) निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्याकडे दाखल केले. तर रोहा पंचायत समितीची ७९ सुकेळी गणासाठी आरक्षित असलेल्या अनुसूचित जमाती महिला जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सौ. नामी महेंद्र हंबीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र असे असले तरी सुकेळीची ही जागा राष्ट्रवादीकडून मित्रपक्ष भाजपला सोडणार असल्याची चर्चा असून तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली  आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार किशोरशेठ जैन, समृद्धी कोळी व नामी हंबीर यांनी नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचे सकाळी ११ वाजता दर्शन घेऊन गांधी चौक, खुमाचा नाका, छ. शिवाजी महाराज बाजारपेठ मार्गे तिन्ही उमेदवारांची वाजत गाजत भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर छ. शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवस्मारकाचे उमेदवारांनी दर्शन घेतले. नंतर रोहाकडे रवाना झालेल्या वाहनांच्या प्रचंड मोठ्या ताफ्यासह हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांच्या साथीने शक्तिप्रदर्शन करीत किशोरशेठ जैन, समृद्धी कोळी व नामी हंबीर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.  उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी असलेला वाहनांचा प्रचंड ताफा पाहून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय आत्ताच निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादीचे नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, विलास चौलकर, संजय भोसले,  नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया महाडिक, डॉ. मिलिंद धात्रक, राष्ट्रवादीचे  विभागीय अध्यक्ष संतोष कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, उपसरपंच अखलाक  पानसरे, संजय काकडे, सुधाकर पारंगे, अनिलशेठ काळे, जुगनशेठ जैन, सचिन कळसकर, प्रमोद जांबेकर, हिराजी शिंदे,  सुरेश जैन, निवास पवार, चंद्रकांत भालेकर, ज्ञानेश्वर साळुंखे, संतोष नागोठणेकर, धनंजय जगताप, पिंटूशेठ जैन, अतुल काळे, अनिल महाडिक, मनोज टके, चेतन टके, प्रथमेश काळे, कार्तिक जैन, जितेंद्र जाधव, केतन भोय, सुधाकर जवके, सखाराम ताडकर, भाई शिर्के, मोहन नागोठणेकर, ॲड. श्रीकांत रावकर, समीर भिकन, झिमाशेठ कोकरे, रुचिर मोरे, बिपीन सोष्टे, आशा शिर्के, संगिता जैन, सुजाता जवके, निष्ठा विचारे, रिचा धात्रक, श्वेता चौलकर, प्रतिभा तेरडे, सुप्रिया काकडे, पूनम काळे, भाविका गिजे, अमृता महाडिक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर व विभागातील कार्यकर्ते तसेच किशोरशेठ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!