खेळमहाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जिंदल माऊंट लिटेरा झी स्कुलच्या विद्यार्थिनीची दमदार कामगिरी
स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जिंदल माऊंट लिटेरा झी स्कुलच्या विद्यार्थिनीची दमदार कामगिरी
स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदल माऊंट लिटेरा झी स्कुलची विद्यार्थिनी कुमारी प्रेक्षा अमर यादव हिने JKA India ४३ व्या संपूर्ण भारत देशाच्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत द्वितीय क्रमांक व रौप्य पदक पटकावत दमदार कामगिरी करून नागोठण्यासह महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे.

ही राष्ट्रीय स्पर्धा १६ जानेवारी ते १८ जानेवारी २०२६ ला [NF] एनएफ रेल्वे इनडोअर स्टेडियम मालीगाव, गुवाहटी (आसाम) येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी प्रेक्षा ची मेहनत, आत्मविश्वास, आवड असल्यामुळे ती यश प्राप्त करू शकली. जिंदल माऊंट लिटेरा झी स्कुलच्या प्राचार्या, उपप्राचार्या, शिक्षकवृंद, प्रशासकीय कार्यालय विभागाकडून तिचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
या निमित्ताने स्कुलच्या प्राचार्या सौ .तनुजा झा व उपप्राचार्या सौ. स्वागतिका साहू यांनी सांगितले की, विद्यार्थांनी शैक्षणिक प्रगती सोबत क्रीडात्मक गोष्टींना सुद्धा प्राधान्य दिले पाहिजे . आपल्यामधील सुप्त कलागुणांना वाव द्यावा. त्यासाठी आम्ही सुद्धा तत्पर आणि प्रयन्नशील आहोत आणि अशाच अनेक विद्यार्थ्यांना आमचे मनापासून प्रोत्साहन व मार्गदर्शन राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.




