धार्मिक सोहळामहिला विशेषशैक्षणिक
सावित्रीबाई फुले यांची जयंती अग्रवाल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये साजरी

सावित्रीबाई फुले यांची जयंती अग्रवाल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये साजरी
महेश पवार
नागोठणे : स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या आणि समाज सुधारण्यासाठी ज्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील अग्रवाल विद्यामंदिर व एस.पी. जैन ज्युनिअर कॉलेज मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अग्रवाल हायस्कूलच्या प्रवेशद्वारात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सजविण्यात आलेल्या टेबलवर ठेवण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या तसवीरीला शाळेचे मुख्याध्यापक डी. एम. पवार यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून, दीप प्रज्वलन करून तसविरीचे पूजन करण्यात आले. यानिमित्त महामार्ग वाहतूक शाखेच्या सपोनी गीतांजली जगताप, ॲड. महेश पवार, महिला दक्षता समितीच्या सदस्या सुजाता जवके, अग्रवाल विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. सविता गोळे, प्रा. मेघना म्हात्रे, प्रा. अमिता पाटील, प्रा. कल्याणी पवार, प्रा. प्रीती दरेकर, प्रा. मानसी शेलार, प्रा. आराधना सुतार, प्रा. खांडेकर मॅडम, प्रा. आबेसिंग गावित, प्रा. के. बी. गाडे आदींसह इतर सर्व शिक्षिका व विद्यार्थीनी यावेळी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे वरिष्ठ लेखनिक संतोष गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.





