अपघातनिधननिवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण
शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
शिवसेना नागोठणे कार्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
शिवसेना नागोठणे कार्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित
रायगडचा बुलंद आवाज टीम
नागोठणे : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीच्या निमित्ताने बैठकीच्या सुरुवातीलाच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांना शिवसेनेच्या पदाधिकारी व परिवर्तन आघाडीच्या उपस्थित कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याबद्दल गौरोद्गार काढून दादांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची भावना यावेळी शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या नागोठण्यातील कार्यालयात संपन्न झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाला शिवसेनेचे नागोठणे जिल्हा परिषद उमेदवार सुमितदादा काते, उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, ज्येष्ठ नेते दत्तात्रेय शिर्के, विभाग प्रमुख प्रवीण ताडकर, विभाग संघटक दिनेश घाग, काँग्रेस शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, काँग्रेसचे युवा नेते पप्पू अधिकारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सागिर अधिकारी, खुर्शीद अधिकारी, ठाकरे शिवसेनेचे नेते गणपत म्हात्रे, हिराजी दुर्गावले, प्रशांत भोईर, वांगणी माजी सरपंच लहुशेठ तेलंगे, पाटणसई ग्रामपंचायत उपसरपंच सुरेश गायकर, इम्रान पानसरे, अजित दळवी, संजय पिंपळे, मुकेश भोय, बाळू रटाटे, शिवसेनेचे प्रकाश मोरे, विजय धामणे, संदिप वाजे, नितीन पत्की, संजय कणघरे, सतीश डाकी यांच्यासह शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मनोजदादा खांडेकर, अशपाक पानसरे, प्रकाश मोरे, दिनेश घाग, गणपत म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून अजितदादा यांना श्रद्धांजली वाहिली.




