महाराष्ट्र ग्रामीणमहिला विशेषशैक्षणिक

श्वेता सुभेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त अग्रवाल विद्यामंदिर येथे वेंडीग मशीनचे वाटप

ॲड. निहा राऊत यांचे महिला सक्षमीकरणावर तर सपोनि गीतांजली जगताप यांचे वाहतूक नियमांचे मार्गदर्शन

श्वेता सुभेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त अग्रवाल विद्यामंदिर येथे वेंडीग मशीनचे वाटप

ॲड. निहा राऊत यांचे महिला सक्षमीकरणावर तर सपोनि गीतांजली जगताप यांचे वाहतूक नियमांचे मार्गदर्शन

महेश पवार 

नागोठणे : नागोठण्यातील प्रतिबिंब फोटो स्टुडिओचे मालक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष विवेक सुभेकर यांच्या दिवंगत पत्नी श्वेता विवेक सुभेकर यांच्या द्वितीय स्मृती दिना निमित्त कोएसोच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील अग्रवाल विद्यामंदिर येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडीग मशीन देण्याचा कार्यक्रम ३ जानेवारीला संपन्न झाला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विवेक सुभेकर यांच्या सहकार्याने आणि नागोठणे लायन्स क्लबच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. याच कार्यक्रमात अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. निहा राऊत यांनी उपस्थित विद्यार्थिनी, शिक्षिका यांना महिला सक्षमीकरण या विषयावर तर सपोनि गीतांजली जगताप यांनी वाहतुकीच्या नियमांवर मार्गदर्शन केले.

अग्रवाल विद्यामंदिरच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या ॲड. निहा राऊत, महामार्ग वाहतूक शाखेच्या सपोनि गीतांजली जगताप, अग्रवाल विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एम. पवार, अग्रवाल विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. सविता गोळे, प्रा. मेघना म्हात्रे, प्रा. कांचन पारंगे, प्रा. सृष्टी खांडेकर, नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष सखाराम ताडकर, उपाध्यक्ष विशाल शिंदे, नागोठणे लायन्स क्लबचे सेक्रेटरी डॉ. अनिल गीते, चार्टर्ड प्रेसिडेंट प्रकाश जैन, एम. जे. एफ लायन विवेक सुभेकर, एम. जे. एफ. लायन सुधाकर जवके, लायन्स सदस्य दौलत मोदी, संतोष शहासने, दीपक गायकवाड, विजय शहासने, सुजाता जवके, विजया म्हात्रे, डॉ. सलोनी सुभेकर,आदींसह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थीनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील देवरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!