महाराष्ट्र ग्रामीणराजकारण

सुमित काते यांना पाच आकडा शुभ असल्याने ते निवडून येणारच : मनोजदादा खांडेकर 

शिवसेनेच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली 

सुमित काते यांना पाच आकडा शुभ असल्याने ते निवडून येणारच : मनोजदादा खांडेकर 

शिवसेनेच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली !
महेश पवार 
नागोठणे : जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत आपले उमेदवार सुमित काते नवीन असल तरी ते उच्चशिक्षित आहेत.  त्यांच्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यांनी गावोगावी स्वखर्चाने अनेक विकासकामे केली आहेत. आपल्या उमेदवारांसोबत पंचायत समितीसाठी उबाठा शिवसेनेच्या अंजलीताई दुर्गावले व अरुणा हंबीर या सुद्धा सोबत आहेत. आपल्या उमेदवारांना घरोघरी जाणे शक्य नसले तरी गावोगावी आणि नागोठण्यातील सर्व भागांत कॉर्नर सभा घेऊन ते लोकांपर्यंत पोचणार आहेत. याशिवाय निवडणुकीचे मतदान हे पाच तारखेला असल्याने तसेच आपल्या उमेदवार सुमितदादा काते यांची जन्मतारीख पाच आल्याने पाच हा आकडा त्यांना शुभ असल्याने ते नक्कीच निवडून येतील असा विश्वास शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांनी शिवसेनेच्या आढावा बैठकीत व्यक्त केला.
शिवसेनेच्या नागोठण्यातील कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे नागोठणे जिल्हा परिषद उमेदवार सुमितदादा काते, उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, ज्येष्ठ नेते दत्तात्रेय शिर्के,  विभाग प्रमुख प्रवीण ताडकर,  काँग्रेस शहर अध्यक्ष अशपाक पानसरे,  काँग्रेसचे युवा नेते पप्पू अधिकारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सागिर अधिकारी, खुर्शीद अधिकारी, ठाकरे शिवसेनेचे नेते गणपत म्हात्रे, हिराजी दुर्गावले, प्रशांत भोईर, वांगणी माजी सरपंच लहुशेठ तेलंगे, पाटणसई ग्रामपंचायत उपसरपंच सुरेश गायकर, इम्रान पानसरे, अजित दळवी, संजय पिंपळे, मुकेश भोय, बाळू रटाटे, शिवसेनेचे प्रकाश मोरे, विजय धामणे, दिनेश घाग, संदिप वाजे, नितीन पत्की, संजय कणघरे, सतीश डाकी यांच्यासह शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी अशपाक पानसरे, प्रकाश मोरे, दिनेश घाग, गणपत म्हात्रे आदींनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
शिंदे शिवसेनेकडून अजितदादांना वाहिली श्रध्दांजली !
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने या आढावा बैठकीच्या निमित्ताने बैठकीच्या  सुरुवातीलाच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांना शिवसेनेच्या पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याबद्दल गौरोद्गार काढून दादांना श्रद्धांजली वाहिली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!