महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक

तालुका स्तरीय कवायती स्पर्धेत अग्रवाल विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय प्रथम 

तालुका स्तरीय कवायती स्पर्धेत अग्रवाल विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय प्रथम 

महेश पवार 
नागोठणे : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या कवायती स्पर्धेत कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील कै. बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलातील गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर व एस.पी. जैन कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोहा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सदर कवायतीसाठी उच्च माध्यमिक विभागाच्या प्राध्यापिका सौ. सविता गोळे आणि माध्यमिक सौ. भाविक सुतार यांनी अपार मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कवायतीची संपूर्ण तयारी करून घेतली होती. या कवायतींचा व्हिडिओ तयार करून तो स्पर्धेसाठी पाठविण्यात आला होता. त्यामधून नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील विद्यार्थ्यांचा कवायतींचा व्हिडिओ अव्वल ठरला.
श्रीमती गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिर,  कै. सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालय, कै. अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळा तसेच श्रीमती आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, नागोठणे येथे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन शाळा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या होत्या. 
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी मुख्याध्यापक तथा प्राचार्य डी. एम. पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, राज्य गीत, ध्वजगीत देशभक्तीपर गीत व  कवायती सादर करण्यात आल्या. त्याचप्रमाणे संविधान रॅली काढण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष अनिल काळे,  सदस्य जयराम पवार, प्रशासकीय अधिकारी डॉ. संदेश गुरव, प्राचार्य डॉ. दिनेश भगत, शाळेचे निवृत्त शिक्षक जी. पी. पाटील, निवृत्त काल शिक्षक भास्कर सोलेगावकर, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ. अनघा लोखंडे, शाळेचे वरिष्ठ लेखनिक संतोष गोळे,  सकाळ सत्र प्रमुख नेताजी गायकवाड, दुपार सत्र प्रमुख रमेश जेडगे, स्टाफ सेक्रेटरी भीमराव शिंदे, अनिल तिरमले, शिक्षक प्रतिनिधी अबेसिंग गावित, तसेच सर्व ग्रामस्थ, पालक वर्ग, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मेघना म्हात्रे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!